
Kangana Ranaut: 'मी दीपिकाची प्रशंसा केली ते फक्त 'या' एकाच कारणामुळे..', कंगना स्पष्टच बोलली
Kangana Ranaut News: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पदूकोणनं भारताचं केलेलं प्रतिनिधित्व पाहता दस्तुरखुद्द कंगना रनौतनं देखील तिचं तोंडभरून कौतूक केलं होतं ते देखील सर्वांसमोर सोशल मीडियावर.
तसं पाहिलं तर कंगना आणि दीपिकामधील कोल्ड वॉर आपल्या सगळ्यांनाच माहित असेल. कंगनानं अनेकदा तिच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली होती. (Kangana Ranaut replies to those who gave negative comments to her praise for deepika padukone)
पण कंगनानं आता दीपिकाची प्रशंसा केलेल्या ट्वीटवर लोक मात्र निगेटिव्ह रिअॅक्शन देताना दिसत आहेत. यावर कंगनानं देखील लोकांना परफेक्ट उत्तर दिलं आहे.
तिनं लिहिलं आहे,''ती कृष्णाची उपासक आहे. जो कौतूकास पात्र आहे त्याची प्रशंसा नं करणं पाप आहे''. चला जाणून घेऊया कंगना नेमकं काय म्हणाली आहे ते.
कंगना रनौतनं ट्वीट केलं आहे की,''जे लोक उगाचच माझ्या दीपिका संदर्भातल्या ट्वीटवरनं आश्चर्य व्यक्त करत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते जास्त विचार करू नका. मी एक साधारण व्यक्ती आहे. कृष्ण धर्माचं पालन करणारी.
कृष्ण सांगतात की जे योग्य नाही त्याचं समर्थन करणं चांगली गोष्ट नाही पण जे योग्य आहे त्याचं समर्थन नं करणं हे तर पाप आहे. बॉलीवूडकरांकडून चूक झाली असेल ही पण मी ती केली नाही''.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
आता कंगनाच्या या ट्वीटवरनं अनेकांनी कंगनाचं कोडकौतूक केलंय. एका युजरनं लिहिलं आहे की,'एकदम योग्य बोललीस. जे चुकीचं चे चुकीचं पण कोणी जर चांगलं काम केलं आहे तर त्यांची प्रशंसा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे मग समोरची व्यक्ती कुणी का असेना'.
आणखी एकानं लिहिलं आहे की,'कंगना नेहमीच बॉलीवूड कलाकारांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करताना दिसते पण बॉलीवूडकर तिला नेहमीच इग्नोर करतात. कारण ते घाबरतात की आपण जर कंगनाच्या बाजूने बोललो तर आपल्या हातातून काम निघून जाईल'.
कंगानानं दीपिकाची प्रशंसा करताना लिहिलं होतं की,''दीपिका पदूकोण किती सुंदर दिसत आहे,तिथे उभं राहून आपल्या देशाचं प्रतिनिधित्त्व करणं सोपी गोष्ट नाही. आणि ते देखील इतक्या ग्रेसफुली आणि आत्मविश्वासानं बोलून..भारतीय महिला जगात बेस्ट आहेत हे दीपिकानं आज दाखवून दिलं''.