Kangana Ranaut: 'कंगणाचं ते स्वप्न अपुर्णचं..', आता अभिनयानंतर या क्षेत्रात नशीब आजमावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: 'कंगणाचं ते स्वप्न अपुर्णचं..', आता अभिनयानंतर या क्षेत्रात नशीब आजमावणार

बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या त्याच्या कामामुळे कमी आणि वक्तव्यांमुळं जास्त चर्चेत असतात. तिनं काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. ती जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर बोलत तिचं मतं मांडत असते. ती सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांसोबतच अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलताना दिसते.

सध्या ती ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळं चर्चेत आहे. कंगना आता दुसऱ्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

अलीकडेच, कंगणाने खुलासा केला आहे की तिला तिचे रेस्टॉरंट उघडायचे आहे. हे तिचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते, परंतु आर्थिक नुकसानीमुळे ती घाटीमध्ये तिचे रेस्टॉरंट उघडू शकली नाही. रेस्टॉरंट सुरू करण्याचे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. पण ते आता लवकरच पुर्ण होईल असंही तिनं तिच्या स्टोरीत लिहिलं आहे.

Kangana Ranaut

Kangana Ranaut

तिचा हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आणि तिला याची आठवण करुन दिल्या बद्दल तिनं तिच्या चाहत्याचे आभारही मानले आहे.

कंगनाने याआधीही सांगितले होते की, 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला तिचे घर गहाण ठेवावे लागले होते, कारण ती एकटीच या चित्रपटाची दिग्दर्शक आणि निर्माती आहे.

ती म्हणाली होती, मी या शहरात 500 आणले होते आणि जर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर मी पहिल्या दिवशी जिथे होते तिथे पुन्हा पोहोचेन.

कंगणाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत दिसणार आहे.

कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत.

, 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय ती 'चंद्रमुखी 2' या तेलुगू चित्रपटात काम करत आहे. कंगना राणौत शेवटची धाकड चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :viralpostkangana ranaut