मंदिरात छोटे कपडे घालणाऱ्यांवर कंगना भलतीच भडकली म्हणाली, गोऱ्यांनी कपड्यांची वाईट सवय लावली, अन् आता.... Kangana Ranaut on wearing shorts in temple | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut on wearing shorts in temple:

Kangana Ranaut: मंदिरात छोटे कपडे घालणाऱ्यांवर कंगना भलतीच भडकली म्हणाली, गोऱ्यांनी कपड्यांची वाईट सवय लावली, अन् आता....

Kangana Ranaut on wearing shorts in temple: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत ही मनोरंजन विश्वातलं चर्चेतलं नाव आहे ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. तिच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा रंगलेली असते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसते.

देशभरातील कोणत्याही परिस्थितीवर कंगना बोलते आणि ती तिच्या प्रतिक्रियेमुळे अनेकदा वादातही सापडली आहे. तिला जे भावते आणि पटते त्यावर ती बोलून जाते. असचं काहीस ट्विट सध्या कंगणाने केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

अलीकडेच तिने एका सोशल मीडिया एका यूजरच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. हिमाचल प्रदेशच्या बैजनाथ मंदिरात काही तरुण वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसल्या, ज्याचे फोटो शेअर करत एका सोशल मिडियावर शेअर करत तिनं मंदिराच्या आत अशा कपड्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. जी पोस्टही सोशल मिडियावर व्हायरल झाली.

आता या पोस्टला पुन्हा शेयर करत कंगनानेही यावर तिचं मत मांडलं. हे वेस्टर्न कपडे आहेत, ज्याचा शोध गोर्‍या लोकांनी लावला आहे आणि त्याचा प्रचार केला आहे, मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून गेले होते, मला आवारातही जाण्याची परवानगी देण्यात आली नाही, मला माझ्या हॉटेलमध्ये परत जावं लागलं आणि ते कतडे बदलावे लागले….नाईट ड्रेस घातलेले हे जोकर म्हणजे आळशी आणि मुर्ख असल्याशिवाय दुसरं काही नसतात... मला वाटत नाही त्यांचा दुसरा काही हेतू असेल, या मूर्खांसाठी कठोर नियम असावेत...'

कंगनाने पोस्ट शेयर केली म्हटल्यावर ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. ज्यानतंर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरवात केली. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

मात्र, कंगनाच्या या पोस्टवर लोकांनी तिलाही सुनावले आहे. एकाने म्हटले, 'कंगना, तू तुझ्या चित्रपटांतून अशा कपड्यांचे प्रमोशन केले आहेस आणि जेव्हा लोक तुझी कॉपी करतात, तेव्हा तुला अडचण होते.' तर काहींनी ती बरोबर बोलत असल्याचही सांगितलं.

नुकतच कंगनाने आकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धाम मध्ये बाबांचे दर्शनाचा व्हिडिओदोखाल शेअर केला आहे. महामंडलेश्वर स्वामी 1008 कैलाशानंद जी महाराज यांनीही कंगनासह धाम येथे भगवान केदारनाथचे दर्शन घेतले. कंगना रणौतने केदारनाथचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.