'जर अभिषेकने फास लावून घेतला असता तर...?' कंगनाचा जया बच्चन यांना थेट सवाल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

नुकतंच समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन या प्रकरणाबाबत संसदेत अशा काही बोलल्या की त्याची आता सगळीकडे चर्चा सुरु झालीये.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यातून काढता पाय घेतला आहे. नुकतंच समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन या प्रकरणाबाबत संसदेत अशा काही बोलल्या की त्याची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली असून पडसाद उमटायला लागले आहेत.

हे ही वाचा: अभिनेत्री समंथा अक्किनेनीने रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खानसाठी का लिहिलं सॉरी? 

राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुस-या दिवशी जया बच्चन यांनी केंद्र सरकारला बॉलीवूडची सुरक्षा आणि समर्थन करण्याचं आवाहन केलं. सोबतंच त्यांनी रवि किशन यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटलं की 'कुछ लोग जिस खाली मै खाते हे उसी मे छेद करते है.' आता जया बच्चन यांच्या या वाक्यावर अभिनेत्री कंगना रनौतने प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनाने ट्विट करत जया यांची मुलं अभिषेक आणि श्वेताचं नाव यात ओढलं आहे. कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे की, 'जया जी माझ्या जागी जर तुमची मुलगी श्वेता असती आणि तिच्या तरुणपणात तिच्यासोबत मारझोड झाली असती, ड्रग्स देऊन तिचं शोषण केलं असतं तेव्हा पण  तुम्ही असंच म्हणाला असतात का? जर अभिषेक सतत छळ आणि शोषणबद्दल बोलता असता आणि एक दिवशी फाशी घेऊन लटकला असता तेव्हा देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? थोडी सहानुभुती आमच्याप्रती देखील दाखवा.' 

कंगनाने जया बच्चन यांना दिलेलं हे प्रत्युत्तर सोशल मिडियावर व्हायरल होतंय. तसंच यावर अनेकजण स्वतःच्या प्रतिक्रिया देत कंगनाच्या बोलण्याचं समर्थन करताना दिसतायेत. 

kangana ranaut slams jaya bachchan for her statement in parliament over drug case in bollywood


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut slams jaya bachchan for her statement in parliament over drug case in bollywood