
Tejas Teaser: 'भारत को छेडोगे, तो छोडेंगे नहीं' , कंगना राणौतच्या 'तेजस' चित्रपटाचा टीझर रिलीज!
कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या तेजस या चित्रपटामुळे चर्चेत होती. आता तिच्या बहुप्रतीक्षित चित्रपट तेजसचा टीझर रिलीज झाला आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तेजसचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कंगना दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहे.
8 ऑक्टोबरला कंगनाच्या तेजस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर 27 ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहात दिसणार आहे.
RSVP द्वारे निर्मित तेजसच्या टिझरमध्ये कंगना खुपच डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. या टीझरच्या सुरुवातीला कंगनाही एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधते. त्यानंतर तिचा दमदार आवाज आणि डायलॉग चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतो.
प्रत्येक वेळी संवाद झालाच पाहिजे असे नाही. आता रणांगणात युद्ध व्हावं असं म्हणत कंगना युद्धाचे रणशिंग फुंकते. 'तेजस' चित्रपटाच्या 1 मिनिट 25 सेकंदाच्या या टीझरमध्ये फक्त कंगनाच दिसत आहे.
'तेजस'मध्ये कंगनासोबत वरुण मित्रा हा रोमान्स करताना दिसणार आहेत. हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या प्रवासाभोवती या चित्रपटाची कथा फिरणार आहे. सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित 'तेजस' चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्सुक आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर तिचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तेजस नंतर कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. यात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.