
Karan Johar शी नेहमी पंगा का घेतेस?, कारण सांगत कंगना म्हणाली,''मी त्याच्याशी नाही तर..''
Karan Johar: बॉलीवूडची पंगा गर्ल कंगना रनौत नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. अनेकदा आपल्या बेताल बोलण्यामुळेच ती चर्चेत येते. तिचं हे बोलणं चाहत्यांना आवडत असलं तरी तिच्यावर अनेकदा ते भारी पडलेलं दिसून आलं आहे. अभिनेत्रीला तिच्या या वागण्यावरनं अनेक टोपणनावं पडली आहेत. कोणी तिला पंगा गर्ल म्हणतं तर कुणी बॉलीवूड क्वीन. कंगना अनेकदा बॉलीवूडच्या बऱ्याच आतल्या गोष्टी समोर आणायचं काम करते. (Kangana Ranaut statement on messing with karan johar..actress said..)
बॉलीवूडमधील नेपोटिझमवर कंगना अनेकवेळा आपला राग काढताना दिसते. या मुद्द्यावर जेव्हा-जेव्हा कंगना बोलते तेव्हा तेव्हा ती करण जोहरला मध्ये ओढते. कंगनानं तर करण जोहरला नेपोटिझम किंग म्हणूनही नाव ठेवलं आहे. तिचं म्हणणं आहे की करणनं स्टार किड्सला लॉंच करण्याचा वीडा उचलला आहे. कंगनाला नुकतंच एका मुलाखती दरम्यान विचारलं गेलं होतं की,'ती करण जोहरशी पंगा का घेते?' यावर कंगनानं स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
कंगना रनौतच्या मते ती कोणा का व्यक्ती विरोधात नाही तर एका सिस्टम विरोधात बोलते. कंगनाचं म्हणणं आहे की करण जोहर त्याच्या आवडीच्या म्हणजे स्टार किड्सनाच पुढे येण्याची संधी देतो. पण ती कोणत्याच फिल्मी बॅकग्राऊंडमधनं आलेली नाही तर तिला मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिला इंग्लीश बोलता यायचं नाही तेव्हा तिची इंडस्ट्रील खिल्ली उडवली गेली. तिला अनेकदा दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली. ती एक लढाई लढतेय आणि तिच्यासोबत अनेकजण या लढाईचा हिस्सा बनले आहेत.
याच मुलाखतीत कंगनानं बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केलं. कंगनानं बॉयकॉटमुळे इंडस्ट्रीच्या होणाऱ्या नुकसानीविषयी बोलताना म्हटलं की,''देशाची लोकसंख्या प्रचंड आहे त्यामुळे याचा मोठा परिणाम होणं अशक्य''.
माहितीसाठी सांगतो की,करण जोहरनं अनेक स्टार किड्सना लॉंच केलं आहे. ज्यामुळे कंगना अनेकदा करणशी पंगा घेताना दिसते. कंगनाचं म्हणणं आहे की स्टार किड्सना कोणत्याच स्ट्रगलशिवाय सहज काम मिळतं.