कंगना कडून केंद्र सरकारची पुन्हा पाठराखण, 'अग्निपथ' योजनेला पाठिंबा

देशभरातून विरोध होत असलेल्या 'अग्निपथ' योजनेला कंगना रणौतने पाठिंबा दिला आहे.
Kangana ranaut supports to agnipath scheme
Kangana ranaut supports to agnipath schemesakal

kangana ranaut : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. म्हणजे कंगना काही बोलली आणि त्यावर खळबळ उठली नाही असे क्वचितच होते. गेले काही दिवस कंगना हिमाचल दौऱ्यावर असल्यामुळे शांत होती. पण आता पुन्हा एकदा तिने एक वादग्रस्त विधान केले आहे. यंदाही तिने नेहमीप्रमाणे केंद्र सरकारची पाठराखण केली आहे. केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत असताना कंगना मात्र केंद्र सरकारच्या बाजूने ठामपणे उभी आहे. (Kangana ranaut supports to agnipath scheme)

Kangana ranaut supports to agnipath scheme
केदार शिंदे : बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांचेही कॉल झाले होते टॅप..

सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. कुठे जाळपोळ तर कुठे तोडफोड असे तीव्र पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारही या विरोधाची आता दखल घेत काही तोडगा निघेल का या विचारात आहेत. अशातच धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रणौतनं(Kangana ranaut) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत अग्निपथ योजनेला समर्थन दर्शवलं आहे. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

sakal

कंगना म्हणते, 'इस्रायल सारख्या देशांनी तरुणांना सैन्य दलात भरती करणं सक्तीचं केलं आहे. काहीजण जीवन मूल्य, शिस्त, राष्ट्रवाद यासाठी आपलं आयुष्यात देशसेवेत घालवतात. अग्निपथ योजनेचा अर्थ फक्त करिअर बनवणे, रोजगार मिळवणे किंवा पैसे कमवणे नसून यापेक्षाही खोल अर्थ आहे. अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे. पूर्वी मुलं गुरुकुलमध्ये जात असे, जसे की त्यांना तसे करण्यासाठी पैसे मिळायचे. सध्याचे तरुण ड्रग्ज आणि पबजीमध्ये आपलं आयुष्य वाया घालवत आहेत. अशा तरुणांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम या योजनेमार्फत होणार आहे. या निर्णयासाठी मी सरकारचं कौतुक करते.' असे कंगनाने लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com