कंगना राणावतला कोरोना; घरातच क्वारंटाइनमध्ये राहून घेतेय उपचार

इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित दिली माहिती
kangana-ranaut
kangana-ranaut

अभिनेत्री कंगना राणावतला Kangana Ranaut कोरोनाची Covid 19 लागण झाली असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली. कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्यापासून ती इन्स्टाग्राम अॅपवर सक्रिय झाली आहे. ध्यानसाधना करत असतानाचा फोटो पोस्ट करत कंगनाने कोरोना झाल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे विलगीकरणात असल्याची माहिती तिने दिली. (kangana ranaut tested positive for covid 19)

कंगनाची पोस्ट-

'गेल्या काही दिवसांपासून मला थकवा आणि क्षीण जाणवत होता. डोळ्यांत जळजळसुद्धा होत होती. मला हिमाचलला जायचं होतं, म्हणून काल मी कोरोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलंय आणि या विषाणूचा माझ्या शरीरात शिरकाव कसा झाला हे मला कळलंच नाही. आता त्यावर मात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही घाबरलात तर ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. त्यामुळे स्वत:वर कोणत्याही गोष्टीला जास्त अधिकार गाजवू देऊ नका. सर्वांनी मिळून या कोरोना विषाणूला संपवूया', अशी पोस्ट कंगनाने लिहिली.

हेही वाचा : दिलदार रोहित शेट्टी; कोरोना रुग्णांसाठी करतोय आर्थिक मदत

कंगनाच्या या पोस्टवर अनेकांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केल्या आहेत.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद

ट्विटरच्या नियमांविरुद्ध मजकूर पोस्ट केल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर कंगनाने 'कू' या अॅपचा आधार घेतला आहे. तर इन्स्टाग्रामवरही ती पुन्हा सक्रिय झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com