Kangana Ranaut: 'मला ट्विटरवर पुन्हा घेशील? एलनला कंगनाचा 'मस्का'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangna Ranaut

Kangana Ranaut: 'मला ट्विटरवर पुन्हा घेशील? एलनला कंगनाचा 'मस्का'!

Kangna viral news: बॉलीवूडची क्वीन म्हणून आता सगळीकडे लोकप्रिय झालेल्या कंगनानं आता थेट एलन मस्ककडे एक विशेष मागणी केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक कंगनाचा एक दिवस असा जात नाही की ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या चर्चेत येत नाही. आताही कंगनाची एक पोस्ट भलतीच वाचली आणि पाहिली जात आहे.

कंगना सहसा कुणाविषयी फारशी चांगलं बोलताना दिसत नाही. तिनं कुणाचं मोठ्या मनानं कौतूक केलं आहे असेही कधीही दिसलेलं नाही. अशावेळी कंगनानं नुकतीच व्टिटरची सुत्रं हाती घेतलेल्या एलन मस्कचं कौतूक केलं तेव्हाच नेटकरी समजून गेले आहे की, कंगनाला नेमकं काय म्हणायचे आहे, कंगनानं तिच्या इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे जी आता भलतीच चर्चेत आली आहे. ती शेयर करताच कंगनाच्या चाहत्यांनी त्यावर तिला वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

एलन मस्क आता ट्विटरचा मालक झाला आहे. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून कंगना ट्विटवर बॅन आहे. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तिला मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच की काय तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. आता एलन मस्क आल्यानं आपल्याला तो पुन्हा ट्विटरवर सहभागी करुन घेईल. असे कंगनाला न वाटल्यास नवल. म्हणून की काय तिनं एक स्टोरी शेयर केली आहे.

Kangna viral news:

Kangna viral news:

हेही वाचा: Vishal Dadlani: 'प्रशासनात धर्माचं काय काम? नोटांवर देवतांच्या फोटोऐवजी...'

कंगनाच्या त्या स्टोरीमध्ये तिनं एलनमस्कविषयीची एक बातमी पोस्ट केली आहे. त्यात त्याचं कौतूकही केलं आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना त्या पदावरुन हटविण्यात आले अशा आशयाची ती बातमी आहे. त्याचा फोटो कंगनानं शेयर केला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी कंगनाला ट्विटरवर सहभागी करुन घ्यावे. असा आग्रह केला आहे. एका नेटकऱ्यानं तर कंगनानं एलनचं कौतूक करुन त्याला मस्का पॉलिश करुन ट्विटर अकाउंट सुरु करण्यासाठी मोहिम सुरु केल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Viral : अभ्यास करतांना लहान मुलाने आपल्या वडिलांना सांगितली अशी गोष्ट