कंगनाचं डोकं ठिकाणावर? भांडण्याच्या नादात दादासाहेब फाळकेंच्या नावाचा केला चूकीचा उच्चार

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

भांडण्याच्या नादात कंगनाचं डोकं ठिकाणावर नाहीये असंचं तिच्या लिखाणातून दिसतंय. कारण कंगनाने चक्क भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केला आहे.

मुंबई- कंगना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आणि त्यातूनंच उघडकीस आलेल्या बॉलीवूड ड्रग प्रकरणात खुलेआम बोलताना दिसून येतेय. तसंच कंगना बॉलीवूडच्या घराणेशाहीवरुनही अनेकांवर आरोप लावतेय. सध्या कंगनाचं अनेकांसोबत ट्विटरवॉर सुरु आहे. यादरम्यान अभिनेता निखिल द्विवेदी आणि कंगनामध्येही जोरदार बाचाबाची झालीये. मात्र भांडण्याच्या नादात कंगनाचं डोकं ठिकाणावर नाहीये असंचं तिच्या लिखाणातून दिसतंय. कारण कंगनाने चक्क भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केला आहे.

हे ही वाचा: सुशांतचा मित्र युवराज म्हणाला, बॉलीवूडमध्ये कॉमन आहे गांजा तर कोकीन आहे पार्टी ड्रग  

त्याचं झालं असं की सपाचे नेते मनीष जगन अग्रवाल यांनी कंगनाला टॅग करत म्हटलं की, 'कंगनाजी तुम्ही सगळ्यांच्या संघर्षाला शिव्या घालत, तुच्छ समजत सगळ्यांवरती निशाणा साधत पुढे जाऊ इच्छिता ? करण जोहर असो किंवा इतर कोणी सिने निर्माता सगळ्यांच्या एकत्र मेहनतीने ही भारतीय सिने इंडस्ट्री उभी राहिली आहे. कोणतीही इंडस्ट्री तुमच्यासारखी सगळ्यांना शिव्या घालत एक-दोन महिन्यात उभी राहत नाही.'

झालं कंगनाला हे बोलणं टोचलं आणि तिने मनीष जगन अग्रवाल यांना सुनावलं. कंगनाने या ट्विटला रिट्विट करत म्हटलं की, 'इंडस्ट्री केवळ करण जोहर किंवा त्याच्या वडिलांनी बनवलेली नाही. बाबासाहेब फाळकेंपासून प्रत्येक कलाकार आणि मजुरांनी बनवली आहे.'

या व्यक्तीला सुनावण्याच्या नादात कंगनाने 'दादासाहेब फाळके' यांचं नाव 'बाबासाहेब फाल्के' करुन टाकलं. ज्या भारतीय चित्रपटसृष्टीने तिला नाव मिळवून दिलं, ज्यामुळे प्रसिद्धि मिळाली त्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या जनकाचं नावं कंगनाला घेता येऊ नये हे दुर्देव. सोशल मिडियावर कंगना या गोष्टीमुळे आता ट्रोल होऊ लागली आहे. भांडण्याच्या नादात कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न आता ट्रोलर्स विचारु लागले आहेत.

kangana ranaut wongly taken dadasaheb phalkes name as babasaheb phalke in argument  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut wongly taken dadasaheb phalkes name as babasaheb phalke in argument