'मला स्त्री म्हणून आदर हवा होता'Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना रनौत

कंगना रनौतला बनायचंय आई!

कंगना रनौत तिच्या सिनेमांसोबतच तिच्या सडेतोड बोलण्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. अर्थात यामुळे ती अनेकदा वादाच्या भोव-यातही सापडली आहे. पण या सगळ्याची फिकीर करेल तर ती कंगना रनौत कसली. नुकतंच कंगना रनौतला पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर तिने आपल्या एका मुलाखतीत चक्क तिला लवकरच आई बनायचंय आणि लग्नही करायचंय अशी कबूली दिली. तिला पुढील पाच वर्षात तू स्वतःला कुठे पाहतेस? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर कंगना सिनेसृष्टीतील तिच्या प्रोजेक्टविषयी बोलेल असं अपेक्षित होतं. मात्र कंगना म्हणाली की, 'येत्या पाच वर्षात तिला आई व्हायचंय आणि लवकरच आपण लग्न करणार आहोत. लग्नासाठी आपल्याला असा जोडीदार हवाय ज्याचं ध्येय नवीन उज्ज्वल भारतासाठी काहीतरी चांगलं करण्याचं असेल. सध्या मी प्रेम आणि त्यापासून मिळणारा आनंद अशा एका सुंदर वातावरणात आहे. आपल्या सर्वांनाही याविषयी लवकरच कळेल', असेही ती पुढे म्हणाली. लग्नानंतरही आपण काम करत राहणार असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.

हेही वाचा: लग्नाआधीच अंकिता लोखंडेवर होतोय गिफ्ट्सचा वर्षाव

कंगनानं पद्मश्री पुरस्कार स्विकारल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुरस्कार स्विकारतानाचा फोटो शेअर केला होता. सध्या त्या फोटोचं कॅप्शन चाहत्यांची वाहवा मिळवतंय. तिनं त्या फोटोला कॅप्शन दिलेलं की,''काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं तेव्हा एक प्रश्न मी सतत स्वतःला विचारत होते....कुणी या इंडस्ट्रीत पैसा मिळवण्यासाठी आलंय,कुणी फॅन्स,कुणी प्रसिद्धी तर कुणी फक्त स्वतःकडे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी आलंय...पण मला काय हवंय? मला एक स्त्री म्हणून इथे हवाय आदर आणि जी माझी खरी संपत्ती असेल. आणि तो आदर या पुरस्काराच्या निमित्ताने मला मिळालाय. मी या सुंदर गिफ्टसाठी माझ्या भारत देशाचे आभार मानते''.

हेही वाचा: "१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक"; कंगनाच्या विधानावरून नवा वाद

कंगना रनौत

कंगना रनौत

कंगना आता आपल्याला तिची निर्मिती असलेल्या टिकू वे्डस शेरू या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत नवाझुद्दिन सिद्दिकीही आहे.

हेही वाचा: हॉट दृश्यासाठी निर्मात्याला मल्लिकाच्या कमरेवर भाजायची होती चपाती

loading image
go to top