कनिका कपूरचा खुलासा.. कोरोना पॉझिटीव्ह होण्याआधी नेमकं कुठे आणि काय घडलं होतं?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

कनिका आता तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहे...कोरोनातून पूर्णपणे बरी झालेल्या कनिकाने आता या उलटसुलट चर्चांंना पूर्णविराम देत अखेर तिचं मौन सोडलंय..नेमकं कसं आणि काय घडलं याची इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून तिने खुलासा केलाय..

मुंबई- गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं कळताच सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाल्या..कनिकाने युके मधुन रिटर्न आल्यानंतर पार्टी केली होती..त्यामुळे सोशल मिडीयवर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली..आणि मग त्या पार्टीत कोण काेण सामिल होतं? कोणाकोणाला त्याची लागण झाली असेल? तीने एकच पार्टी केली की मग ती आणखी पण कुठे गेली होती? असे एक ना अनेक प्रश्न मग उभे राहिले..आणि मग कनिकाबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्या...कनिकाची पाचवेळा कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आणि नंतरचे तीन रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर मग तिला हॉस्पिटलमधून डिस्टार्ज देण्यात आला..कनिका आता तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहे...कोरोनातून पूर्णपणे बरी झालेल्या कनिकाने आता या उलटसुलट चर्चांंना पूर्णविराम देत अखेर तिचं मौन सोडलंय..नेमकं कसं आणि काय घडलं याची इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून तिने खुलासा केलाय..

हे ही वाचा: ऐकावं ते नवलंच, बिग बींच्या रुममध्ये कोण आलं पहा..

कनिकाने या पोस्टमध्ये लिहिलंय, ''मला माहित आहे माझ्या कथेची वेगवेगळी रुपं आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत आली आहेत.. मी आत्तापर्यंत गप्प राहिले म्हणून अनेकांनी त्यात तेल ओतायचा प्रयत्न केला..माझी चूक होती म्हणून मी गप्प नव्हते तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय म्हणून मी गप्प बसले होते. योग्य वेळ येण्याची मी वाट पाहत होते.. मी माझ्या कुटुंबाचे, मित्र-मैत्रीणींचे आणि सहक-यांचे आभार मानते आणि तुम्हीसुद्धा सुरक्षित असाल अशी आशा करते..

Kanika Kapoor enjoys evening tea with family in Lucknow ...

मला तुम्हाला काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत.मी सध्या आईवडिलांसोबत माझ्या लखनऊ इथल्या घरी आहे..युके असो, मुंबई किंवा मग लखनऊ माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे..मी १० मार्चला युकेहून मुंबईला आले आणि विमानतळावर माझी योग्य ती तपासणी झाली..त्यावेळी मला क्वारंटाईन रहावं लागणार असं काहीही सांगितलं नव्हतं.. (युकेने १८ मार्चला नियमावली लागू केली) मला कोणतीच लक्षणं जाणवत नव्हती म्हणून मी देखील स्वतःला क्वारंटाईन केलं नव्हतं..माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी ११ मार्चला लखनऊला गेले.. त्यावेळी देशांतर्गत विमानतळावर स्किनिंग नव्हती..१४ आणि १५ मार्चला मी माझ्या मित्र मैत्रीणींसोबत लंच आणि डिनरला गेले होते..मुख्य म्हणजे मी स्वतः कोणतीच पार्टी आयोजित केली नव्हती आणि माझी तब्येतसु्द्धा व्यवस्थित होती..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stay Home Stay Safe

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

१७ आणि १८ मार्चला माझ्यात लक्षणं दिसायला लागली तेव्हा मग मी कोरोनाची टेस्ट केली. १९ मार्चला माझी टेस्ट झाली आणि २० मार्चला मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं मला सांगण्यात आलं. मग लगेचच मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कोविड-१९चे तीन रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला. आणि आता मी २१ दिवस घरीच राहणार आहे. माझ्या डॉक्टर आणि नर्सेसची मी आभारी आहे.. तुम्ही प्रत्येकजण याकडे संवेदनशील आणि प्रामाणिकपणे पाहाल अशी मी आशा करते..एखाद्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवल्याने सत्य बदलत नाही'' असंही तिने म्हटलंय.

kanika kapoor breaks silence after being brutally slammed  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanika kapoor breaks silence after being brutally slammed