Nitin Gopi Death: वयाच्या ३९ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाकारांना धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gopi, nitin gopi death

Nitin Gopi Death: ३९ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाकारांना धक्का

Nithin Gopi Death News: कन्नड चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नितीन गोपी यांनी शुक्रवारी सकाळी 2 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 39 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

वृत्तानुसार, अभिनेत्याला बेंगळुरू येथील त्याच्या घरी छातीत दुखू लागले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याची प्राणज्योत मालवली.

(Kannada actor Nithin Gopi dies due to heart attack dies at age of 39)

नितीन गोपी यांनी टीव्हीवरही काम केले आणि हरा हरा महादेव या मालिकेच्या काही भागांमध्ये कॅमिओ केले आणि अनेक तमिळ मालिकांमध्ये काम केले.

अभिनेता अलीकडेच एका वाहिनीसोबत नवीन मालिका दिग्दर्शित करण्यासाठी दीर्घकाळ चर्चेत होता. नितीन गोपी यांच्या आकस्मिक निधनाने चंदन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

'हॅलो डॅडी' फेम अभिनेता त्याच्या आई-वडिलांसोबत बेंगळुरूमधील इट्टामाडू येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. नितीन गोपी यांच्या अकाली निधनाने साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी शोक व्यक्त केला.

'हॅलो डॅडी' मध्ये अभिनेता नितीन गोपीने डॉ. विष्णुवर्धन यांच्यासोबत काम करुन लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात, नितीनने विष्णुवर्धनच्या मुलाची भूमिका साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं होतं.

नितीन गोपीने 'निशब्धा', 'चिराबांधव्य', 'मुथिनांथा हेंडथी', 'केरलीदा केसरी' आणि इतर अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. नितीनने टीव्ही इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे, त्यातील सर्वात महत्वाची मालिका 'पुर्नविवाह'. या मालिकेला चांगलं TRP रेटिंग मिळालं आहे. नितिन 'हर हर महादेव'च्या काही एपिसोडमध्येही दिसला होता. नितीनने तमिळ मालिकांमध्येही काम केले होते.

टॅग्स :Bollywood News