चरबीमुक्ती शस्त्रक्रियेनंतर कन्नड अभिनेत्रीचा मृत्यू

राजाजीनगरमधील डॉ. शेट्टी कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली.
Kannada actress chetana Raj dies fat removal surgery
Kannada actress chetana Raj dies fat removal surgerysakal

बंगळूर : कन्नड अभिनेत्री चेतना राज (वय २१) हिचा चरबीमुक्तीच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. सोमवारी रात्री एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. चेतना ही दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांमुळे लोकप्रिय होती. राजाजीनगरमधील डॉ. शेट्टी कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली. तिच्या फुप्फुसात पाणी साचले. त्यानंतर तिला ह्रदयविकाराचा झटका आला. याबाबत कुटुंबीयांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दोष दिला. शस्त्रक्रियेसाठी परवानगी घेतली नाही तसेच सुविधा नसताना शस्त्रक्रिया केली, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com