esakal | टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिलं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Kannada television actress Soujanya

टीव्ही अभिनेत्रीने संपवलं जीवन; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं कारण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कन्नड अभिनेत्री Kannada tv actress सौजन्याने Soujanya आत्महत्या केली. अभिनेत्रीने बेंगळुरूमधील कुम्बाल्गोडू याठिकाणी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सौजन्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलीस तिच्या कुटुंबीयांची आणि मित्रमैत्रिणींची चौकशी करत आहेत. सौजन्याच्या घरातून एक सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे. 'माझ्या आत्महत्येसाठी कोणीच कारणीभूत नसून मी स्वत: हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी जबाबदार आहे', असं त्यात लिहिलं आहे. सौजन्याने या नोटमध्ये तिच्या आईवडिलांची माफीसुद्धा मागितली आहे. चिठ्ठीमध्ये असंही म्हटलं आहे की, तिला कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती. मात्र तिने आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना केला त्यापासून तिला मानसिक त्रास सहन करावा लागला, असंही त्यात लिहिलंय. ज्या लोकांनी तिची मदत केली, त्यांचेही तिने चिठ्ठीत आभार मानले आहेत.

सौजन्याने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. सौजन्याने आत्महत्या का केली याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तिने ज्या कलाकारांसोबत काम केलं, त्यांचीही चौकशी पोलीस करणार आहेत. सौजन्याच्या आत्महत्येने कन्नड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कन्नड इंडस्ट्रीतील अभिनेत्री जयश्री रामैय्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं होतं. त्यानंतर आता सौजन्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस कन्नड फेम अभिनेत्री चैत्रा कोतूर हिनेसुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

loading image
go to top