Rishabh Shetty: 'हात जोडतो कांताराचा हिंदीत रिमेक करु नका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Shetty

Rishabh Shetty: 'हात जोडतो कांताराचा हिंदीत रिमेक करु नका'

Kantara Vs Bollywood : साऊथच्या कांतारानं आता देशभरात आपल्या नावाचा वेगळा ट्रेंड सेट केला आहे. अशावेळी त्याचा दिग्दर्शक ऋषभवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. मुळ कन्नड भाषेतील कांताराचा अन्य दुसऱ्या कोणत्याही भाषेत रिमेक केला जाऊ नये. असे ऋषभनं म्हटले आहे. एका मुलाखतीतील त्याचे ती विनंती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मी बॉलीवूड निर्मात्यांना विनवून सांगतो की, त्यांनी माझ्या कांताराचा हिंदी रिमेक बनवू नये. त्याचे कारण त्यांना चित्रपटातच कळेल. काही चित्रपट असे असतात की, त्यांची भावना ही त्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या हदयापर्यत जाते. आणि भिडते. अशावेळी आपण त्या मुळ कलाकृतीची कॉपी करण्यात काहीही पॉइंट नाही. असे मला वाटते. तरी देखील माझी काही वेगळी कारणे आहेत. ती ऋषभनं यावेळी सांगितली आहेत.

मला का नकोय कांताराचा रिमेक?

रिषभ म्हणाला, बॉलीवूडचे मार्केट सध्या कोणत्या स्थितीत आहे हे सर्वांना माहिती आहे. साऊथचे चित्रपट बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर बिझनेस करताना दिसत आहे. अशावेळी एखाद्या ओरिजनल चित्रपटाचा रिमेक तयार करणे आणि त्याचे सादरीकरण होणे हे मला पटत नाही. तो चित्रपट ज्या मातीतला आहे त्याची कॉपी करुन तो कितपत प्रेक्षकांना रुचेल, पटेल याविषयी शंका आहे. म्हणून मला जास्त भीती वाटते.

हेही वाचा: Kantara Twitter Review: केजीएफचा बाप 'कांतारा', हादरवून सोडणारा, गुंगवून टाकणारा

लोकांना भिडते ती त्या चित्रपटातील भावना. तो एक धार्मिक आस्थेसंबंधी असलेला चित्रपट आहे. अशावेळी त्याचा रिमेक तयार करुन तो सादर होणे हे मला आवडणार नाही. मी कांतारासाठी खूप मेहनत घेतली आहे. कांतारा हा ओरिजनल कन्नड भाषेतील आहे. या चित्रपटानं आता एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे. भाषेची बंधनं झुगारुन लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अशावेळी त्याचा रिमेक हा विचार करवत नाही. असे ही ऋषभनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: Kantara Movie: कांतारावरुन का पेटलाय वाद? 'भूत कोला' नेमकं आहे तरी काय?