कपिल शर्माची गूड न्यूज; निघाला 'बेबीमून'ला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कपिल आणि गिन्नी मुंबई एअरपोर्टवर ट्रिपच्या मूडमध्ये दिसले. त्यामुळे दोघं आनंदात असून आता बेबीमूनला निघाले आहेत... आणि चाहते नव्या छोट्या कॉमेडियनची वाट बघत आहेत.

नवी दिल्ली : कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी छत्रात यांच्याकडे 'गूड न्यूज' असल्याचे खुद्द कपिलनेच स्पष्ट केले आहे. आता हे कपल 'बेबीमून' म्हणजेच प्रेग्नंसी ट्रीपवर चाललेत. दोघं जण अत्यंत खूश असून बाळाच्या येण्याची वाट बघत आहेत. 

kapil sharma

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीनुसार कपिलने सांगितले की, 'मी आणि गिन्नी कुटूंबात नव्या येणाऱ्या पाहुण्याबाबत खूप उत्सुक आहोत. आमच्यासह आमच्या घरचेही खूप आनंदी आहेत. गिन्नीच्या आणि बाळाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. आमच्यापेक्षाही माझी आई जास्त उत्सुक आहे. आम्ही सर्व गिन्नीची व्यवस्थित काळजी घेत आहोत. मुलगा किंवा मुलगी काहीही झाले, तरी आम्ही खूश आहोत.' 

कपिल आणि गिन्नी मुंबई एअरपोर्टवर ट्रिपच्या मूडमध्ये दिसले. त्यामुळे दोघं आनंदात असून आता बेबीमूनला निघाले आहेत... आणि चाहते नव्या छोट्या कॉमेडियनची वाट बघत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapi Sharma wife ginny Chatrath is pregnant and going to the babymoon