कपिलकडून सुनीलला विमानातच अपमानास्पद वागणूक

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

विनोदी अभिनेता कपिल शर्मा याने विमान प्रवासादरम्यान सहकलाकार सुनील ग्रोव्हरला अपमानास्पद वागणूक देऊन धक्काबुक्की केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे सुनील "द कपिल शर्मा शो' सोडून जाणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - विनोदी अभिनेता कपिल शर्मा याने विमान प्रवासादरम्यान सहकलाकार सुनील ग्रोव्हरला अपमानास्पद वागणूक देऊन धक्काबुक्की केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे सुनील 'द कपिल शर्मा शो' सोडून जाणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. विमान प्रवासादरम्यान कपिलने सुनीलला अपमानास्पद वागणूक दिली. त्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, विमान कर्मचारी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळळा. या प्रकारामुळे नाराज झालेला सुनील पुन्हा कपिलच्या शो मध्ये येणार नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. "जर कपिलने हा प्रकार असाच सुरू ठेवला तर इतर कलाकारही त्याला सोडून जातील', अशा प्रतिक्रिया सुनीलने व्यक्त केल्या आहेत. मात्र या वृत्तावर कोणतीही अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. कपिल मद्यधुंद अवस्थेत सहकलाकारांसोबतचे संबंध बिघडवत असल्याची टीका वारंवार करण्यात येत असते.

कोण आहे सुनील ग्रोव्हर?
सुनील विनोदी लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. "कॉमेडी नाईटस्‌ वुईथ कपिल' या शोमधील "गुत्थी'ची भूमिका अधिक गाजली. याशिवाय त्याने काही चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. "कपिल शर्मा शो' मधील सुनीलच्या डॉ. मशूर गुलाटी, रिंकू भाभी या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

Web Title: Kapil assaulted Sunil on a flight