कपिल शर्माच्या घरी दुस-यांदा येणार चिमुकला पाहुणा, व्हिडिओमध्ये दिसलं पत्नी गिन्नीचं बेबी बंप

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 20 November 2020

कपिलची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. कपिलच्या पत्नीने २०१९ मध्ये पहिली मुलगी अनायरा शर्माला जन्म दिला होता. अनायरा आता ११ महिन्यांची झाली आहे.

मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोड बातमी आहे. कपिल शर्मा दुस-यांदा वडिल बनणार आहे. लवकरंच कपिलच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. कपिलच्या पत्नीने २०१९ मध्ये पहिली मुलगी अनायरा शर्माला जन्म दिला होता. अनायरा आता ११ महिन्यांची झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ती दुस-या मुलाला जन्म देईल. म्हणजेच नवीन वर्षात कपिल शर्माच्या घरी आणखी एक सदस्याचा समावेश होईल.

हे ही वाचा: अमिताभ यांच्याकडे नाहीये एकही ATM कार्ड, स्वतः केला खुलासा

गिन्नीने तिच्या प्रेग्नंसीचे ६ महिने पूर्ण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कपिलची आई देखील मुंबईमध्ये कुटुंबासोबत आहे. गिन्नीच्या प्रेग्नंसीचा खुलासा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला आहे. ज्यामध्ये ती मोबाईलमध्ये बिझी दिसतेय. यादरम्यान तिचं बेबी बंप दिसून येतंय.

kapil sharma, kapil sharma wife, kapil sharma son, kapil sharma children, ginni chatrath, कपिल शर्मा, कपिल की पत्नी, Ginni Chatrath Pregnant, Kapil Sharmas Wife pregnant, News18 Hindi

करवाचौथच्या निमित्ताने भारती सिंह इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत लाईव्ह होती. या दरम्यान जेव्हा जेव्हा ती घरी बिझी होती तेव्हा इंस्टा लाईव्हच्या दरम्यान व्हिडिओमध्ये आली. मात्र असं असलं तरी कपिल शर्मा किंवा गिन्नीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.   

kapil sharma and wife ginni chatrath all set to welcome second child in january 2020  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma and wife ginni chatrath all set to welcome second child in january 2020