esakal | 'काहीही न करता पैसे कसे कमावतो'?, कपिलनं विचारला होता राजला प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sharma and raj kundra

'काहीही न करता पैसे कसे कमावतो'?, कपिलनं विचारला होता राजला प्रश्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) आता मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा पॉर्न व्हिडिओ (porn video) बनविणे आणि ते शेयर करणे यात सहभाग पोलिसांना आढळून आला आहे. यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 23 जुलैला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सध्या वेगवेगळ्या स्तरांतून राजवर टीका होताना दिसत आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि पोस्टही पुन्हा शेयर करुन त्यावरुन शिल्पाला देखील ट्रोल करण्यात आले आहे. (kapil sharma asked raj kundra the source of his income old video going vira yst88)

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या शो मधील एक व्हिडिओ यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळी कपिलनं शिल्पा शेट्टी आणि तिच्या फॅमिलीची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. त्यात कपिलनं राजचे काय काय व्यवसाय आहेत हे सांगताना त्याला एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे राज तुम्ही पैसे कमविण्यासाठी नेमका काय व्यवसाय करता? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याला उपस्थित प्रेक्षकांनी हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली होती. हा व्हिडिओ खूप आधीचा आहे.

आता तो राज कुंद्राच्या घटनेच्या निमित्तानं पुन्हा व्हायरल झाला आहे. राज बरोबर 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असे सांगितले आहे की, आमच्याकडे राजच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही त्याला अटक केली आहे. येत्या काही दिवसांत पुढील तपासात अनेक गोष्टी समोर येतील. असा अंदाजही यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजचे पाय आणि खोलात जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे की, राज कुंद्रा य़ा प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.

हेही वाचा: शाल विकणारा 'शिल्पाचा पती' कसा झाला 'अरबपती'?

हेही वाचा: 'यापुढे इंडियन आयडलचं 'होस्टिंग' करणार नाही'

सध्या सोशल मीडियावर 2016 मध्ये कपिलच्या शो मधील शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर आधारित एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात शिल्पा आणि राज हे गेस्ट म्हणून त्या कार्यक्रमामध्ये आले होते. कपिलनं त्यांना तुम्ही पैसे कसे कमावता हा प्रश्न विचारला होता. कपिल म्हणाला होता, मी तुम्हाला बऱ्याचदा पार्टी करताना, सेलिब्रेटींबरोबर फुटबॉल खेळताना पाहिले होते. एवढेच नाही तर पत्नीबरोबर शॉपिंगला जातानाही पाहिले होते. त्यामुळे हा प्रश्न विचारला.

loading image