HBD कपिल शर्मा- एकेकाळी कपिलकडे घर चालवायला देखील नव्हते पैसे; आता महिन्याला कमावतो करोडो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कॉमेडी किंग कपिल शर्मा आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे...कपिलला सुरुवातीला गायक बनण्याची इच्छा होती..मात्र त्याच्या नशिब काही वेगळंच सांगत होतं..

मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्मा आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे...कपिलचा जन्म आजच्या दिवशी १९८१ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला..कॉमेडियन असण्यासोबतंच त्याने अभिनेता म्हणून देखील स्वतःची ओळख बनवली आहे..इतकंच नाही तर कपिल उत्तम गायकही आहे...त्याच्या अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमरमुळे तो आज घराघरात पोहोचला आहे..

Kapil Sharma has worked in a PCO | Happy Birthday Kapil Sharma ...

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच कपिल शर्माचे चाहते आहेत..कोणत्याही वयोगटाचील व्यक्तिला कपिलचं नाव माहित नाही असं क्वचितंच असेल..म्हणूनंच त्याला 'कॉमेडीचा बादशाह' म्हटलं जातं..आज कपिलच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊया..

lockdown: हृतिक घेतोय पियानोचे धडे, मात्र या गोष्टीमुळे येतोय सतत अडथळा

अमृतसरमध्ये जन्मलेल्या कपिलचं खरं नाव कपिल पुंज आहे..मात्र या इंडस्ट्रीत पाऊल टाकल्यानंतर त्याने त्याचं नाव बदलून कपिल शर्मा केलं..कपिलचे वडिल पोलिस कॉन्स्टेबल होते..कॅन्सरमुळे कपिलच्या वडिलांचं निधन झालं..यादरम्यान कपिलची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने कपिल अस्वस्थ होता..कपिलला सुरुवातीला गायक बनण्याची इच्छा होती..मात्र त्याच्या नशिब काही वेगळंच सांगत होतं..

I don't want to be known as just a stand-up comedian" Kapil Sharma

आणि मग कपिलने गाणं सोडून थेट 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या तिस-या सिझनमध्ये सहभागी झाला..आणि मग काय...या सिझनचा विजेता झाल्यावर कपिलचं नशिबंच पलटलं..असं असलं तरीही कपिल मध्यंतरीच्या काळात अस्वस्थ होता..मात्र त्यानंतर २०१० ते २०१३ दरम्यान तो सलग 'कॉमेडी सरकस'चा विजेता बनला...

The rags to riches story of Kapil Sharma no one talks about

त्यानंतर तो एक नवीन शो 'द कपिल शर्मा शो' घेऊन आला..ज्यामुळे त्याने 'कॉमेडी किंग' ही त्याची ओळख बनवली..कपिलसाठी २०१६ पासून २०१७ पर्यंतचं वर्ष खास ठरलं..यादरम्यान कपिलचं नशीब इतकं चमकलं होतं की २०१६च्या फोर्ब्समधील सगळ्यात जास्त १०० श्रीमंतांच्या यादीत कपिलचं ११ वं नाव होतं..यानंतर २०१७मध्ये तो याच यादीत १८व्या स्थानावर होता..एकेकाळी आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणारा कपिल आज वर्षभरात ५८ कोटींपेक्षा जास्त कमावतो..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday mumy V luv u sooo much...Stay Happy n Healthy always @kapilsharma

A post shared by Ginni Chatrath (@ginnichatrath) on

कपिलच्या याच प्रसिद्धीमुळे त्याचं गिन्नी चतरथसोबतचं लग्न चांगलंच चर्चेत राहिलं..केवळ याच गोष्टीमुळे नाही तर सहकलाकार सुनील ग्रोवर सोबतच्या भांडणामुळे देखील तो खूप चर्चेत राहिला होता..या भांडणानंतर सुनीलने कपिलवर शिव्यागाळ करण्याचा आणि सहकलाकाराला कमी लेखण्याचा आरोप देखील लावला होता..

Kapil Sharma Finally Broke His Silence On His Fight With Sunil ...

यानंतर कपिलचं नाव पडत चाललं होतं..त्याच्या नशेच्या सवयीमुळे आणि उद्धट वागण्यामुळे तो चर्चेत राहिला..यादरम्यान कपिल नैराश्यात गेला होता..ज्यामुळे मध्यंतरीच्या काळात जेव्हा त्याला बघितलं तेव्हा त्याचं वजन खूप वाढलेलं होतं..मात्र आता पुन्हा एकदा डबल धमाक्यासोबत त्याने पुनरागमन केलंय..

Kapil Sharma Finally Shares FIRST PICS Of Daughter Anayra Sharma

कपिल काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे..त्याच्या घरी एका छोट्या परीने जन्म घेतला आहे...कपिल अनेकदा त्याची मुलगी अनायराचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतो..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Jai mata di #ashtami #kanjakpoojan #daddysgirl #anayra #daughter #3monthsold #gratitude

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

नुकताच कपिलने कन्यापूजनाच्यावेळी शेअर केलेल्या फोटोला सोशल मिडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे...

kapil sharma birthday special know some unknown facts about him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma birthday special know some unknown facts about him