कपिलला लागलेला नाट काही सुटेना; प्रेयसी जिनीनेही दिली सोडचिठ्ठी

टीम ई सकाळ
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेल्या मारहाणीनंतर कपिल शर्माच्या मागे लागलेला नाट काही सुटता सुटत नाहीय असं दिसतं. कारण, हा वाद झाल्यानंतर कपिलने एकेदिवशी आपली प्रेयसी जिनी चत्रथसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडीयावर टाकला होता. आम्ही एकमेकांच्या प्रेमात असून, या वर्षाखेरीस लग्नही करणार असल्याचे कपिलने पोस्ट केले होते. पण ते आता होईल असे दिसत नाही. कारण जिनी आणि कपिलमध्ये कमालीचा वाद झाला असून तिने त्याला सोडचिठ्ठी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शोमधील एक स्री कलाकार कपिलच्या कमालीच्या प्रेमात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कळते. 

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेल्या मारहाणीनंतर कपिल शर्माच्या मागे लागलेला नाट काही सुटता सुटत नाहीय असं दिसतं. कारण, हा वाद झाल्यानंतर कपिलने एकेदिवशी आपली प्रेयसी जिनी चत्रथसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडीयावर टाकला होता. आम्ही एकमेकांच्या प्रेमात असून, या वर्षाखेरीस लग्नही करणार असल्याचे कपिलने पोस्ट केले होते. पण ते आता होईल असे दिसत नाही. कारण जिनी आणि कपिलमध्ये कमालीचा वाद झाला असून तिने त्याला सोडचिठ्ठी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शोमधील एक स्री कलाकार कपिलच्या कमालीच्या प्रेमात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कळते. 

कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या आणि नाव न सांगण्याच्या अटीवर गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि जिनीमध्ये बेबनाव झालेला आहे. कपिल शर्मा शोमध्ये काम करणारी एक महिला कपिलच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. तिला कोणी काही बोलले तरी कपिल चिडतो. तिच्यासाठी अनेक बाबतीत विशेष सवलती आहेत. यावरूनच जिनी आणि कपिलमध्ये बेबनाव झाला आहे. सुनील ग्रोव्हरला झालेल्या मारहाणीनंतर कपिल सातत्याने चर्चेत आहे. त्याच्या मागे लागलेला अडचणींचा ससेमिरा काही संपायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे आता यातून बाहेर पडण्यासाठी कपिला पुन्हा एकदा सावरावे लागेल, असेही त्या मेम्बरने सांगितले. 

Web Title: kapil sharma ginny splits again esakal news