ब्रेकिंग: कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने बजावले समन्स

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 7 January 2021

कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

मुंबई- कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केलेल्या फसवणूक आणि बनावट प्रकरणाबाबत कपिलची चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय. 

हे ही वाचा: लग्नानंतर गौहर खानने घेतला करिअरमधील मोठा निर्णय, यापुढे 'ही' गोष्ट कधीच करणार नाही  

कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रिया च्या विरोधात फसवणूक आणि बनावट केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता त्याला साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं आहे. गेल्यावर्षी २८ डिसेंबरला डीसी डिझाईनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. छाब्रिया यांच्यावर फसवणूकीचा आणि बनावट केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० बी आणि ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. 

 

दिलीप छाब्रिया भारतातील प्रसिद्ध कार डिझायनर म्हणून ओळखले जातात. दिलीप यांनी भारतातील स्पोर्ट्स कार डिझाईन केली होती. त्यांनी अमिताभ बच्चन पासून ते शाहरुख खान पर्यंत अनेक सेलिब्रिटींची कार डिझाईन केली आहे. कारसोबतंच ते  सेलिब्रिटींच्या आलिशान वॅनिटी देखील डिझाईन करतात. शाहरुखसोबतंच कपिलकडे देखील दिलीप यांनी डिझाईन केलेली वॅनिटी वॅन आहे.  

kapil sharma has been summoned by crime branch in connection with car designer dilip chhabria case 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma has been summoned by crime branch in connection with car designer dilip chhabria case

Tags
टॉपिकस
Topic Tags: