'राणी टोमॅटोचा भाव काय आहे?'; कपिलच्या प्रश्नावर ती म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'राणी टोमॅटोचा भाव काय आहे?'; कपिलच्या प्रश्नावर ती म्हणाली...
'राणी टोमॅटोचा भाव काय आहे?'; कपिलच्या प्रश्नावर ती म्हणाली...

'राणी टोमॅटोचा भाव काय आहे?'; कपिलच्या प्रश्नावर ती म्हणाली...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असणारा कार्यक्रम म्हणजे कपिल शर्माचा कॉमेडी शो. भलेही कोरोनाच्या काळात हा कार्यक्रम पूर्णपणे रिटेलिकास्ट दाखवण्यात आला. मात्र तरीही त्याच्या टीआरपीमध्ये काही एक फरक पडलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाला प्रमोशन शो म्हणूनही अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या चित्रपट, वेब सीरिजचं प्रमोशन करण्यासाठी कित्येक सेलिब्रेटी या शो मध्ये जातात. याला कारण म्हणजे या कार्यक्रमाचा असणारा टीआरपी. आताही बंटी आणि बबली 2 च्या टीमनं कपिलच्या शो ला भेट दिली. त्यामुळे पुन्हा हा शो चर्चेत आला आहे.

राणी मुखर्जी ही सध्या तिच्या बंटी आणि बबली 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तिनं पूर्वीच्या बबलीची भूमिका केली आहे. पहिल्या बंटी आणि बबलीमध्ये ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान आहे. याशिवाय शर्वरी वाघ आणि सिद्धांत चतुर्वेदीही या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्या बंटी आणि बबलीची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी कपिलच्या शो मध्ये देखील सहभाग घेतला होता.

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं...; एकदा वाचाच

कपिलनं आपल्या नेहमीच्या शैलीत राणीची फिरकी घेण्यास सुरुवात केली. त्याला राणीनंही तितक्याच दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. यावेळी केवळ राणीच नाहीतर सैफ अली खान आणि बाकीचे अभिनेते देखील हजर होते. त्यावेळी कपिलनं राणीला विचारलं टोमॅटोचे भाव काय आहेत? याचे कारण असे की, बंटी आणि बबलीमध्ये राणी ही एका गृहिणीच्या भूमिकेत आहे. राणीनं कपिलला उत्तरं दिलं. ती म्हणे मला याबद्दल काहीही माहीती नाही. त्यावर कपिलनं एक मिश्किल टिप्पणी केली. तो म्हणतो, बरोबर आहे, राणी एवढी मोठी अभिनेत्री आहे की, ती टोमॅटोला थोडीच भाव देणार ?..... कपिलच्या त्या वक्तव्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना हसू आवरत नाही.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

loading image
go to top