इतना तो चलता है भाई : कपिल शर्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

मेलबर्न आणि सिडनी येथे स्टेज शो करून भारतात परतत असताना सुनील ग्रोवर त्याच्या जागेवर बसला होता.

मुंबई : "मी पाच वर्षांत पहिल्यांदाच सुनीलवर ओरडलो. इतना तो चलता है भाई. आम्ही बसून काय अडचण आहे त्यावर बोलू," असे सांगत कॉमेडियन कपिल शर्मा याने सुनील ग्रोवरसोबतच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

सुनील ग्रोवर हा डॉ. मशहूर गुलाटी हे विनोदी पात्र कपिल शर्माच्या शोमध्ये साकारतो. कपिलने प्रेयसी जिनी हिच्याशी असलेले नाते जगजाहीर केल्यानंतर त्याच्या वादग्रस्त वर्तनावरून तो पुन्हा चर्चेत आला. मेलबर्न आणि सिडनी येथे स्टेज शो करून भारतात परतत असताना सुनील ग्रोवर त्याच्या जागेवर बसला होता. कपिल अचानक त्याच्याकडे गेला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. 

त्यानंतर कपिलने सुनीलची कॉलर पकडली आणि त्याच्यावर हात उगारला. त्यावर सुनीलने कपिलच्या शिवीगाळ आणि मारहाणीला काहीही उत्तर दिले नाही. त्याने मौन पाळले, असे सूत्रांनी सांगितले. या प्रसंगाचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर कपिलने आज (सोमवार) सकाळी फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले. 
 

Web Title: kapil sharma spat with sunil grover