कॉमेडियन कपिल शर्माने सुरु केली शूटींग, सेटवर मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 20 July 2020

कॉमेडियन कपिल शर्मा देखील त्याच्या शोची शूटींग लवकरंच सुरु करणार असं गेले कित्येक दिवस आपण ऐकत होतो अखेर जवळपास १२५ दिवसांनतर या प्रसिद्ध कॉमेडी शोच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटात लॉकडाऊन सुरु असल्याने मनोरंजन क्षेत्रातील सर्व शूटींग बंद होत्या. मात्र आता हळूहळू छोट्या पडद्यावरच्या कार्यक्रमांच्या शूटींगला सुरुवात होतेय. काही मालिकांच्या शूटींगला तर सुरुवातही झाली आहे आणि नवीन एपिसोड टीव्हावर दिसायला देखील लागले आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा देखील त्याच्या शोची शूटींग लवकरंच सुरु करणार असं गेले कित्येक दिवस आपण ऐकत होतो अखेर जवळपास १२५ दिवसांनतर या प्रसिद्ध कॉमेडी शोच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. 

हे ही वाचा: कंगना रनौतच्या 'बी-ग्रेड' वक्तव्यावर तापसी-स्वराने घेतली शाळा..

लॉकडाऊनमुळे जवळपास १२५ दिवस घरात घालवल्यानंतर आता कपिल शर्मा त्याच्या शोचं शूटींग करण्यासाठी सज्ज झालाय. कपिलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही व्हिडिओ पोस्ट केले आहे ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या या काळात त्याचे सहकलाकार द कपिल शर्मा सेटवर पोहोचताना दिसत आहेत.

यामध्ये एका व्हिडिओला कॅप्शन देताना कपिलने लिहिलंय, 'सगळी काळजी घेतली जात आहे.' या व्हिडिओ क्लीपमध्ये सुमोना चक्रवर्ती दिसतेय तर दुस-या व्हिडिओ क्लीपमध्ये कॉमेडियन भारती सिंहला सेटवर येण्याआधी सॅनिटाईज करत असल्याचं दिसतंय. तिच्या शारिरिक तापमानाची नोंद घेताना देखील ती दिसतेय. 

यासोबतंच कपिलने इंस्टाग्रामवर भारती सिंहसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कपिलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारती आणि कपिल बॅकस्टेज मस्ती करताना दिसत आहेत. सगळे कलाकार सेटवरील कर्मचा-यांना आनंदाने मदत करत आहेत. लॉकडाऊननंतर कपिलच्या शोमध्ये पहिला पाहुणा कोण असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अभिनेता सोनू सूद कपिलच्या शोचा पहिला सेलिब्रिटी गेस्ट असणार असल्याच्या खूप चर्चा आहेत.    

kapil sharma starts shooting stars seen having fun on the sets see video  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma starts shooting stars seen having fun on the sets see video