Bhagwant Mann: राज्यसभेच्या सीटसाठी लावतोय 'मस्का'!, कपिल शर्मा ट्रोल

पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपशविधी नुकताच पार पडला.
kapil sharma and bhagwant mann
kapil sharma and bhagwant mannesakal

Tv Entertainment News: पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपशविधी नुकताच पार पडला. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव (social media news) सुरु झाला आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता भगवंत मान यांच्यावर पोस्ट करणाऱ्या कपिल (Kapil sharma show) शर्मावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Entertainment news) त्याचं कारण म्हणजे कपिलनं केलेलं लेटेस्ट ट्विट. शहिद दिवसानिमित्तानं भगवंत मान यांनी भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन सुरु करण्यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला होता. त्या व्हिडिओचं कौतूक कपिल शर्मानं केलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कपिलची बोलतीच बंद केली आहे.

एका युझर्सनं लिहिलं आहे की, अचानक कपिलकडून भगवंत मान यांचं कौतूक होणं यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. कपिल एवढ्या सहजासहजी कुणाचं कौतूक करणार नाही. आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, कपिलची पोस्ट म्हणजे आता त्याला राज्यसभेची सीट हवी असणार. त्यामुळे त्यानं अशाप्रकारे स्वताला प्रमोट करायला सुरुवात केली आहे. तो एकप्रकारे भगवंत मान यांना मस्का पॉलिशच करतो असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यावर कपिलनं देखील ट्रोलर्सला जशास तसं उत्तर दिलं आहे.

kapil sharma and bhagwant mann
मुस्लिम धर्माविरोधात थिएटरात घोषणा; प्रकाश राजना खटकला The Kashmir Files

कपिलनं त्या ट्रोलर्सला म्हटलं आहे की, आपण जे म्हणता आहात ते बरोबरच आहे. माझं एकच स्वप्न आहे. ते म्हणजे आपल्या देशाची प्रगती व्हायला हवी. तुमच्या नोकरीसाठी त्यांच्याकडे बोलू का? अशा कानपिचक्या कपिलनं दिल्या आहेत. भगवंत मान यांनी देखील एक कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये भाग घेतला होता. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्या कार्यक्रमाचे परीक्षक नवज्योत सिंग सिद्घु आणि शेखर सुमन हे होते. तर कपिल शर्मा हा तिसऱ्या शो विजेता होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com