एकताच्या बोल्ड चित्रपटात अनुराग- तापसी

anurag kashyap tapasee pannu
anurag kashyap tapasee pannu

मुंबई - बॅालिवूडमधील हटके दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुरागचे चित्रपट नेहमीच वेगळे असतात.  गॅंग्स ऑफ वासेपूर,बॅाम्बे वेल्वेट, मनमर्जिया या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन अनुरागने केले आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली सेक्रेड गेम्स ही अनुरागने दिग्दर्शित केली आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपट आणि वेब सिरीजला प्रेक्षकांचा विषेशत: नव्या पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळतो. बोल्ड चित्रपट आणि डेली सोपची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि अनुराग कश्यप हे आता एका नव्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. याआधी एकता आणि अनुरागनं 'उडता पंजाब' आणि 'लुटेरा' या चित्रपटांसाठी एकत्र काम केले. 

'कल्ट मूव्हीज'चा पहिला चित्रपट 'दो बारा'
एकता कपूरने 'कल्ट मूव्हीज' या नावाने एक नविन प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. 'हे नवीन प्रोडक्शन हाऊस अशा लेखक आणि दिग्दर्शकांसाठी असणार आहे. ज्यांना बोल्ड विषयांवरील कथा मोठ्या पडद्यावर मांडायची आहे.'  असे एकताने सांगितले आहे.  या आधी अल्ट बालाजी नावाच्या अॅपची सुरूवात एकताने केली होती ज्यामध्ये बोल्ड वेब सिरीज आणि चित्रपट होते. अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप या चित्रपटात काम करणार आहेत.

प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'दो बारा' हा असणार आहे. या चित्रपटात तापसी आणि अनुरागची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना चित्रपटात दिसणार आहे. 'या चित्रपटातून आम्ही प्रेक्षकांसाठी नवी कथा घेऊन येत आहोत आणि यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तापसीसोबत माझा हा तिसरा चित्रपट आहे. यावेळी आम्ही थ्रिलरसोबतच एक चांगली कथा सुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत.' असे अनुरागने या चित्रपटाबद्दल सांगितले.     

'दो बारा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
'दो बारा' या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी रिलीज झाला. या टिझर मधून हा चित्रपट साय-फाय आणि थ्रिलर चित्रपट असणार असे लक्षात येते. तापसी पन्नू  या टिझरमध्ये मध्यरात्री कोणत्यातरी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना दिसते. त्यानंतर ती अलेक्साला त्यावेळच्या वातावरणाबद्दल विचारते आणि मग स्मार्ट टीव्हीवर कोणतातरी अतरंगी चित्रपट लावण्यास सांगते. त्यानंतर टीव्हीवर चित्रपट सुरू होतो आणि स्क्रीनवर अनुराग कश्यप दिसतो. या दोघांमध्ये असं बोलणं सुरू होतं जसं की दोघंही एकमेकांच्या समोर बसून बोलत आहेत. तेवढ्यात अनुराग तिला टेबलवरील स्क्रिप्ट वाचण्यास सांगतो आणि ती त्याला चित्रपटाचं नाव विचारते. तर तो म्हणतो वेळ पाहा. आत्ताची घड्याळातील वेळ हीच चित्रपटाचं नाव आहे आणि चित्रपटाचं नाव हीच आत्ताची वेळ आहे. त्यावेळी घड्याळात २ वाजून १२ मिनिटं झालेली असतात. म्हणजेच 'दो बारा'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com