देओल कुटुंबात आनंदाचे वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

देओल कुटुंबात सध्या आनंदी आनंद साजरा होतोय. देओल कुटुंबात असं आनंदी वातावरण असायला कारणही तसंच आहे. देओल कुटुंबातील तिसरी पिढी बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण करायला सज्ज झालीय. धर्मेंद्रचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल फेब्रुवारीतील तिसऱ्या आठवड्यात त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतोय. त्यामुळेच देओल खानदानात आनंदी वातावरण आहे. करण देओल आपल्या घरचा बॅनर असलेल्या "विजयेता फिल्म्स'मधून बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल टाकतोय. याच बॅनरअंतर्गत सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओलने करियरला सुरुवात केली होती. नातूही या क्षेत्रात पदार्पण करीत असल्यामुळे आजोबा धर्मेंद्र कमालीचे खूश आहेत.

देओल कुटुंबात सध्या आनंदी आनंद साजरा होतोय. देओल कुटुंबात असं आनंदी वातावरण असायला कारणही तसंच आहे. देओल कुटुंबातील तिसरी पिढी बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण करायला सज्ज झालीय. धर्मेंद्रचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल फेब्रुवारीतील तिसऱ्या आठवड्यात त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतोय. त्यामुळेच देओल खानदानात आनंदी वातावरण आहे. करण देओल आपल्या घरचा बॅनर असलेल्या "विजयेता फिल्म्स'मधून बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल टाकतोय. याच बॅनरअंतर्गत सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओलने करियरला सुरुवात केली होती. नातूही या क्षेत्रात पदार्पण करीत असल्यामुळे आजोबा धर्मेंद्र कमालीचे खूश आहेत. त्यांना विश्‍वास आहे की, देओल वंशाच्या मनोरंजन परंपरेला करण पुढे नेईल. 
 

Web Title: KARAN DEOL welcome bollywood