करण जोहरने मधुर भांडारकरची मागितली माफी, मात्र सिनेमाच्या टायटलबाबत म्हणाला..

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 27 November 2020

काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरने करण जोहरवर त्याच्या प्रोजेक्टचं टायटल हिसकावल्याचा आरोप केला होता. ज्याचं उत्तर आता करण जोहरने सोशल मिडियावर दिलेलं दिसतंय.

मुंबई- सिनेमाच्या टायटलसाठी निर्माता मधुर भांडारकर आणि करण जोहरचा वाद थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरने करण जोहरवर त्याच्या प्रोजेक्टचं टायटल हिसकावल्याचा आरोप केला होता. ज्याचं उत्तर आता करण जोहरने सोशल मिडियावर दिलेलं दिसतंय. करण जोहरने ट्विटरवर अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलंय. 

हे ही वाचा: मुंबई हल्ल्यातील अज्ञात गोष्टींवर बनतोय मेडिकल ड्रामा, 'मुंबई डायरीज २६/११' चा फर्स्ट लूक रिलीज  

करण जोहरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''हे माझा प्रिय मित्र मधुर भांडारकर याच्यासाठी. यासोबत एक फोटो करण जोहरने शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने त्याचा अधिकृत जबाब जाहीर केला आहे. आमचं नातं खूप जूनं आहे. आम्ही या एकत्र-एकजुट असलेल्या इंडस्ट्रीचा कित्येक वर्षांपासून एक भाग आहोत. या वर्षात मी तुमच्या कामाचा एक मोठा प्रशंसक देखील आहे आणि मी नेहमीच तुमचं भलंच पाहिलं आहे. मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर नाराज आहात.''

करणने पुढे म्हटलंय, ''गेल्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला झालेल्या असुविधांसाठी मी माफी मागतो. मात्र मला हे स्पष्ट करायचं आहे की आम्ही हे नवीन आणि वेगळं टायटल 'फॅब्युलस लाईव्स ऑफ बॉलीवुड वाईव्स' आमच्या नॉन फिक्शन फ्रेंचाईजीच्या फॉर्मट लक्षात घेता ठेवलं होतं. कारण आमचं टायटल हटके होतं म्हणून आम्हाला वाटलं की तुम्ही नाराज नाही होणार. आम्ही आश्वासन देतो की यामुळे तुमच्या प्रोजेक्टला काहीही नुकसान होणार नाही.''

karan johar apologises to madhur bhandarkar for fabulous lives of bollywood wives title  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johar apologises to madhur bhandarkar for fabulous lives of bollywood wives title