Karan Johar: 'K' वरून नाव ठेवलं म्हणजे चित्रपट चालणारच! या भ्रमात होता करण जोहर.. पण याच अंधश्रद्धेनं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 karan johar birthday special story know about his films k formula change after munnabhai movie

Karan Johar: 'K' वरून नाव ठेवलं म्हणजे चित्रपट चालणारच! या भ्रमात होता करण जोहर.. पण याच अंधश्रद्धेनं..

karan johar birthday : कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना जे चित्रपट प्रदर्शित होऊन आज वारिच वर्षे झाली. पण अजूनही या चित्रपटांची किमया कमी झालेली नाही.

या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला केलाच शिवाय आजही जे चित्रपट टेलिव्हिजनवर आवर्जून पाहिले जातात. कारण ही जादू आहे करण जोहरच्यादिग्दर्शनाची.

प्रेम, वात्सल्य, आणि रोमान्स याचा पुरेपूर वापर करून त्याने तयार केलेले रंजक सिनेमे प्रेक्षकांना आजही भुरळ घालतात. त्याच करणचा आज 51वा वाढदिवस.. या निमित्ताने जाणून घेऊया करणचे 'k' गुपित काय आहे, ज्याच्या त्याला मोठा फटका बसला होता...

( karan johar birthday special story know about his films k formula change after munnabhai movie)

प्रसिद्ध निर्माता यश जोहर आणि हिरू जोहर यांचा मुलगा म्हणजे करण जोहर. करणला अभिनेता व्हायचे होत पण नियतीला ते मान्य नसल्याने तो दिग्दर्शक आणि पुढे निर्माता झाला. १९८९ मध्ये 'श्रीकांत' या मालिकेपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. ही मालिका दूरदर्शनवरून प्रसारित केली जायची.

लहान असताना करणचे वजन वयाच्या मानाने जास्त होते. त्यामुळे त्याचे वडील कायम त्याने वजन कमी करावे, यासाठी प्रयत्न करायचे. तू पाच-सहा किलो वजन कमी कर मग तू नक्कीच अभिनेता होशील, असे ते सांगायचे. परंतु करणने अभिनेता व्हायच्या ऐवजी दिग्दर्शक म्हणून आपले करिअर केले.

'कुछ कुछ होता है' सारखा हिट सिनेमा त्याने दिला. करणने दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. (bollywood movie)

त्यावेळी शाहरुख खानने त्याला स्वतःचा सिनेमा बनव असा सल्ला दिला होता. त्यानंतर करणने 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा केला. या सिनेमाला त्यावर्षीचे सात फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाली होती.


त्यानंतर करणने कभी खुशी कभी गम, कभी अलविदा न कहना, कल हो ना हो, कलंक असेहि बरेच सिनेमे केले. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे नाव 'k' अक्षरावरून सुरु व्हायचे. असं म्हणतात कि त्याचा न्यूमरॉलॉजीवर विश्वास आहे. म्हणून तो हे करत होता.

आपण 'k' वरून चित्रपटाचे नाव ठेवले म्हणजे तो चित्रपट हीट होणारच असा भ्रम त्याला होता. परंतु २००५ साली आलेला 'काल' हा सिनेमा फ्लॉप झाला. तेव्हापासून 'k' चे समीकरण बदलले. आणि करणला (karan johar) त्याची चूक उमगली.

शिवाय असं म्हणतात की २००६ मध्ये आलेल्या लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात नन्यूमरॉलॉजी वर टीका करण्यात आली होती. या संकल्पनेतील फोलपणा लक्षात आल्यावर करणने 'k' प्रकरणाचा नाद सोडला आणि त्याच्या सिनेमाचे शीर्षक बदलू लागले.

टॅग्स :Bollywood NewsKaran Johar