करण जोहर झाला जुळ्या मुलांचा बाप

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षी अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला होता.

मुंबई - बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. करण जोहर स्वतः ट्विटरवरून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. 

करण जोहरला सरोगसीच्या मदतीने झालेल्या जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करणने आपल्या मुलीचे नाव ‘रुही’, तर मुलाचे नाव ‘यश’ असे ठेवले आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आले आहे.

मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही. करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती.

भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षी अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला होता.

Web Title: karan johar is dad to twins via a surrogate