करण जोहरने सोशल मिडियावर बनवलं खाजगी अकाऊंट? अनेक सेलिब्रिटी करतायेत फॉलो..

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Monday, 13 July 2020

करण सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोशल मिडियावर ऍक्टीव्ह नाहीये. आता तर असं कळतंय की खास बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी करण जोहरने एक सिक्रेट खाजगी अकाऊंट बनवलं आहे. 

मुंबई-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा घराणेशाही आणि मक्तेदारीच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला.  त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान, सोनम कपूर, अनन्या पांडे सारख्या अनेक सेलिब्रिटींना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. सोशल मिडियावरील या वातावरणामुळे अनेक सेलिब्रिटींनी त्यांचं अकाऊंट खाजगी केलं तर काहींनी काही काळासाठी डिऍक्टीव्ह केलं. करण देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोशल मिडियावर ऍक्टीव्ह नाहीये. आता तर असं कळतंय की खास बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी करण जोहरने एक सिक्रेट खाजगी अकाऊंट बनवलं आहे. 

हे ही वाचा: ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना झाल्याचं कळाल्यावर विवेक ऑबेरॉयने केलं ट्विट..

करण जोहर पहिल्यांदाच घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन ट्रोल होतोय असं नाही. तो याआधी देखील या मुद्द्यांवरुन ट्रोल झाला आहे. मात्र यावेळी सुशांतचे चाहते त्याला वाट्टेल तसं बोलत आहेत. नुकतंच इंस्टाग्रामवर करण जोहरच्या नावाचं एक अकाऊंट दिसून आलं आहे.

'karanaffairs' असं या अकाऊंटच नाव आहे. मात्र हे एकाऊंट अधिकृत केल गेलेलं नाहीय. आश्चर्याची बाब म्हणजे  करणच्या या अकाऊंटला शाहरुखची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन, आणि अनन्या पांडे हे फॉलो करत आहेत. यावरुन आता असा अंदाज बांधला जातोय की बॉलीवूड सिलेब्रिटींसाठी करणने आता एक खाजगी अकाऊंट सुरु केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी करणच्या एका मित्राने सांगितलं होतं की, सुशांतच्या आत्महत्येनंतर लोक ज्या प्रकारे त्याला ट्रोल करत आहेत ते पाहून तो पूर्णपणे कोसळला आहे. त्याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, करणच्या जवळ असलेली सगळी मंडळी सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. आणि यासाठी करण स्वतःला जबाबदार समजत आहे. इतकंच नाही तर करणच्या ३ वर्षांच्या मुलांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे त्यामुळे करण दिवसरात्र रडत आहे.यापुढे जाऊन

करणच्या मित्राने हे देखील सांगितलं की, जेव्हा त्याला फोन करतो तेव्हा तो रडायला लागतो आणि विचारतो की मी असं काय केलं आहे ज्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागत आहे? त्याने सांगितलं की तो सध्या खूप घाबरला आहे आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मात्र यानंतर काही दिवसांनी नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये करण दिसून आल्याने तो पुन्हा ट्रोल झाला आहे.   

karan johar has a private account for celebrities on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johar has a private account for celebrities on social media