Tejran: गर्लफ्रेंडला ओवाळलं, मग किस केलं, व्हिडिओ व्हायरल

बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Karan Kundra Tajasswi
Karan Kundra Tajasswi

Bigg Boss 15: बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये करणनं तेजस्वीला किस केलं आहे. तसेच तिचं स्वागत करुन तिची आरतीही केली आहे. सध्या तेजस्वी ही नागिनच्या (Nagin 6) सहाव्या पर्वाच्या तयारीत आहे. त्यावरुनही तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगलचा सामना करावा लागला होता. केवळ कलर्स वाहिनीवर काम करणारी अभिनेत्री आणि त्यात नागिनच्या सहाव्या पर्वातील मुख्य कलाकार म्हणून तिला विजेतेपद देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

त्यानंतर करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या गुलाबी नात्याची चर्चा व्हायरल झाली आहे. बिग बॉस 15 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. हा सीझन संपल्यानंतर देखील त्यांचं डेटिंग हे काही चाहत्यांपासून लपून राहिलं नाही. त्यात त्यांचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ हा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटस् नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

तेजस्वी आणि करण कुंद्रा हे त्यांच्या चाहत्यांमध्ये तेजरन या नावानं प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांना या नावानं सर्वाधिक सर्चही केलं जातं. आता ते त्यांच्या रिलेशनशिपवरुन चर्चेत आले आहेत. त्यांच्या लग्नाचीही सर्वाधिक चर्चा आहे. त्याला त्यांच्या कुटूंबियांची संमती असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या त्या दोघांचा एक व्हिड़िओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्यामध्ये करण कुंद्रानं तेजस्वीचं स्वागत करुन तिला ओवाळलं आहे. त्यानंतर तिला किसही केलं आहे. हा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

Karan Kundra Tajasswi
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com