करणसिंग ग्रोवर नच बलियेचा अँकर? 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

स्टार प्लस वाहिनीने त्यांचा प्रसिद्ध शो नच बलियेचा आठवा सीझन घेऊन येण्याची तयारी सुरू केलीय. हा शो बीबीसी वर्ल्डची निर्मिती असणार, असं बोललं जातंय. त्यामुळेही हा शो भव्यदिव्य असणार अशी चर्चा आहे. त्याचबरोबर या आठव्या सिझनच्या अँकरिंगसाठी करणसिंग ग्रोवर याला विचारण्यात आले आहे. टेलिव्हिजन हार्थरॉब असलेला करणसिंग ग्रोवर बिपाशा बासूबरोबर लग्न झाल्यानंतर चर्चेत होताच; पण तसेही तो नेहमीच चर्चेत असतो. त्याचा जलवा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना लक्षात आहे. त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर बघायला त्याचे फॅन्स उत्सुक आहेतच. त्यामुळे करणच्या प्रसिद्धीची किनार या शोलाही लाभेल, असं निर्मात्यांना वाटतंय.

स्टार प्लस वाहिनीने त्यांचा प्रसिद्ध शो नच बलियेचा आठवा सीझन घेऊन येण्याची तयारी सुरू केलीय. हा शो बीबीसी वर्ल्डची निर्मिती असणार, असं बोललं जातंय. त्यामुळेही हा शो भव्यदिव्य असणार अशी चर्चा आहे. त्याचबरोबर या आठव्या सिझनच्या अँकरिंगसाठी करणसिंग ग्रोवर याला विचारण्यात आले आहे. टेलिव्हिजन हार्थरॉब असलेला करणसिंग ग्रोवर बिपाशा बासूबरोबर लग्न झाल्यानंतर चर्चेत होताच; पण तसेही तो नेहमीच चर्चेत असतो. त्याचा जलवा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना लक्षात आहे. त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर बघायला त्याचे फॅन्स उत्सुक आहेतच. त्यामुळे करणच्या प्रसिद्धीची किनार या शोलाही लाभेल, असं निर्मात्यांना वाटतंय. या नव्या सीझनमध्ये एखाद्या विशेष भागासाठी बिपाशा बासूलाही बोलावण्यात येणार आहे. नुकतंच लग्न झाल्यामुळे आपल्या लग्नानंतरचे काही खास अनुभव, आठवणी या वेळी ते दोघे नक्कीच सांगतील; पण हे विशेष सरप्राईज प्रेक्षकांसाठी असणार आहे. ते शो सुरू झाल्यानंतरच यातलं कोड उलगडेल. करण याआधी जरा नचके दिखा हा शो होस्ट करताना दिसला होता. आता नच बलियेच्या या नव्या सीझनसाठी तूर्तास त्याला शुभेच्छा देऊया...

Web Title: Karan Singh Grover to make a comeback on television as Nach Baliye host?

टॅग्स