करणसिंह ग्रोव्हरचा जलवा पुन्हा छोट्या पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 May 2019

टीव्ही जगात स्टनींग बॉय करण सिंह ग्रोव्हरने नाव कमावले. पण बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर करण टीव्हीच्या कोणत्या मालिकेत अभिनय करताना दिसला नाही. आता मात्र करण टीव्हीकडे परतलाय...

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत आता तब्बल 18 वर्षांनंतर श्री. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होत आहे. 2001 मध्ये या व्यक्तिरेखेने या मालिकेत खूपच उलथापालथ घडवून आणली होती. या मालिकेचे यंदा नव्या संचात प्रसारण सुरू झाल्यापासून बजाजची भूमिका कोणता कलाकार साकारणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती आणि अनेक कलाकारांच्या नावांची चर्चाही होत होती. पण, आता ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून करणसिंह ग्रोव्हर हा तगडा कलाकार ही भूमिका साकारणार आहे!

karan

करणसिंह सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत असून ऋषभ बजाजच्या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवील. नव्या संचातील मालिकेत करणसिंह ग्रोव्हर हा एकमेव कलाकार असा आहे, जो पूर्वीच्या मालिकेतही होता. तेव्हा त्याने बजाजच्या जावयाची भूमिका साकारली होती. मालिकेची निर्माती एकता कपूर हिच्यामते तोच या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल. 

karan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karan Singh Grover will return to the small screen with popular daily soap