करणसिंग ग्रोवरचे कमबॅक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

अभिनेता करणसिंग ग्रोवर त्याच्या "दिल मिल गये' आणि "कुबुल है' या मालिकांमधून अनेक जणांचा आवडता स्टार बनला. त्याच्या या मालिकांबद्दल त्याचे फॅन्स अजूनही बोलतात. त्यानंतर करणने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला; पण आता करण टीव्हीवर परत येत आहे. तो एका ट्रॅव्हल शोचा होस्ट म्हणून काम करणार आहे. करणला साहस आणि फिरण्याची आवड आहेच, त्यामुळेच त्याने हा शो करण्याचे ठरवले. या शोची सुरुवात युरोपपासून होणार आहे. ज्यामध्ये करण प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या जागांवर घेऊन जाणार आहे.  
 
Web Title: karansingh grover come back