निसर्गाच्या सान्निध्यात अशा प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत करिना, सैफ आणि तैमुर..

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 15 November 2020

करिना कपूर खान मुलगा तैमुरसोबत धर्मशालामध्ये पोहोचली आहे. तर सैफ अली खान देखील त्याचं डलहौजी येथील शूट संपवून धर्मशालाला पोहोचला आहे. करिनाने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

मुंबई- बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मिडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत प्रत्येक कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत सणाचा आनंद शेअर करत आहेत. अशा खास दिवशी करिना कपूर खान मुलगा तैमुरसोबत धर्मशालामध्ये पोहोचली आहे. तर सैफ अली खान देखील त्याचं डलहौजी येथील शूट संपवून धर्मशालाला पोहोचला आहे. करिनाने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

हे ही वाचा: रितेश देशमुखने आईच्या जुन्या साडीपासून बनवले खास दिवाळीसाठी कपडे, व्हिडिओ व्हायरल  

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मलाईका अरोरा आणि जॅकलीन फर्नांडिस देखील धर्मशाला इथे पोहोचल्या आहेत. करिेनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती मलाईकासोबत पोज देताना दिसून येतेय. तर दुसरीकडे एका फोटोमध्ये सैफसोबत मलाईका आणि जॅकलीन दिसून येत आहेत. 

PICS: Kareena Kapoor, Malaika Arora Celebrate Diwali With Saif Ali Khan &  Arjun Kapoor In Dharmshala

करिनाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ती सैफ आणि तैमुरसोबत आगीच्या समोर बसलेली दिसतेय. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिलंय, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. करिना कपूर लवकरच दुस-यांना आई बनणार आहे. सध्या ती तिची सेकंड प्रेग्नंसी खूप एन्जॉय करतेय. यासोबतंच ती तिच्या शोचं शूटींग देखील करत आहे. अनेकदा सेटवरिल तिचे फोटो सोशल मिडियावर झळकत असतात. 

kareena kapoor celebrate diwali with saif and taimur in dharamshala malaika and jacqueline join them  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kareena kapoor celebrate diwali with saif and taimur in dharamshala malaika and jacqueline join them