esakal | करिनानं घातल्या महागड्या इयरिंग्ज; किंमत ऐकून थक्क व्हाल
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor expensive earrings viral on social media

करिनानं घातल्या महागड्या इयरिंग्ज; किंमत ऐकून थक्क व्हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : करिना कपूर सध्या गुड न्यूजच्या निमित्तानं चर्चेत आहे. अर्थात ही गुड न्यूज तिच्याकडून नाहीय बरंका! गुड न्यूज नावाचा सिनेमा येतोय. तिचा त्यामुळं ती सध्या चर्चेत आहे. या प्रमोशनसाठी ती सध्या वेगवेगळ्या शोमध्ये हजेरी लावत आहे. तशाच एका शोमध्ये तिच्या इयरिंग्ज चर्चेचा विषय ठरल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कपिल शर्मा आणि इयरिंग्ज 
गुडन्यूजची संपूर्ण टीममध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी धावपळ करत आहे. त्यासाठी या टीमनं कलिप शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये करिनानं आपल्या कॅरेक्टरविषयी काय सांगितलं? सिनेमाविषयी काय सांगितलं. या पेक्षा तिच्या इयरिंग्जचीच चर्चा जोरात सुरू आहे. तिनं या शोमध्ये सध्याचे सगळ्यात महागडे इयरिंग्ज घातले होते. त्या कोणताही हिरा किंवा सोनं नाणं नव्हतं तर, त्या इयरिंग्ज कांद्याच्या होत्या. कांद्याच्या दरावरून सध्या सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि व्हिडिओ फिरत आहेत. त्यातच करिनाच्या या इयरिंग्जनं भर टाकलीय. या इयरिंग्जच्या माध्यमातून कांदा किती महागलाय, हे या शोमध्ये हलक्या फुलक्या पद्धतीनं दाखवण्यात आलं. उपस्थितांनी त्याला दादही दिली. 
 


ट्विंकलकडं पोहोचल्या इयरिंग्ज 
दरम्यान, अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्नाकडंही या कांद्याच्या इयरिंग्ज पोहोचल्या आहेत. तिनं नुकताच इंस्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे, कपिल शर्माच्या शोमध्ये करिनासोबत अक्षयकुमारही होता. त्यानंही कपिलच्या इयरिंग्जच्या कल्पनेला दाद दिली. अक्षय केवळ दाद देऊन थांबला नाही तर, त्यानं त्या इयरिंग्ज आपल्यासोबत नेल्या आणि ट्विंकलला दिल्या. करिनाला या इयरिंग्ज आवडल्या नाहीत. पण, तुला नक्की आवडतील, म्हणून मी घेऊन आलोय, असं सांगत अक्षयनं ट्विंकलला त्या गिफ्ट केल्या आहेत.

 


27 डिसेंबरला होणार रिलीज 
गुड न्यूज सिनेमामध्ये अक्षयकुमार, करिना कपूरसोबतच कियारा अडवाणी आणि दलजित डोसांझ दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोला यू-ट्यूबवर जोरदार प्रतिसाद मिळालाय. प्रोमोच अनेकांना पोट धरून हसायला लावणारा असल्यानं सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे. सिनेमा येत्या 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे. ख्रिसमस आणि एयर एन्डच्या सुट्यांमुळं सिनेमाचा चांगला रिस्पॉन्स मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा :
धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६० हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका