करिना कपूरची मानवंदना 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

करिना कपूर खान गरोदर असल्यापासून ते तिच्या मुलाच्या नावापर्यंत सगळ्याची जोरदार चर्चा झाली. त्यात तिचा लॅके फॅशन वीकमधला रॅम्प वॉक असो वा मुलगा झाल्यानंतर तिचं तिच्या कुटुंब आणि नवऱ्याबरोबरचं फिरायला जाणं असो. ती अशी पहिली अभिनेत्री आहे, जी आपल्या मुलाच्या जन्मानंतर वरचेवर पब्लिक अपीअरन्स करते आहे. एवढंच नाही; तर कामालादेखील सुरुवात करतेय. यात तिने आणखी एक गोष्ट करून दाखवली आहे. आपल्या मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांच्या आत तिने स्टेज परफॉर्मन्स केलाय. ज्यात ती तीनही खान आणि तिचा पती सैफ अली खानला मानवंदना देणार आहे. तिने एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा परफॉर्मन्स केला.

करिना कपूर खान गरोदर असल्यापासून ते तिच्या मुलाच्या नावापर्यंत सगळ्याची जोरदार चर्चा झाली. त्यात तिचा लॅके फॅशन वीकमधला रॅम्प वॉक असो वा मुलगा झाल्यानंतर तिचं तिच्या कुटुंब आणि नवऱ्याबरोबरचं फिरायला जाणं असो. ती अशी पहिली अभिनेत्री आहे, जी आपल्या मुलाच्या जन्मानंतर वरचेवर पब्लिक अपीअरन्स करते आहे. एवढंच नाही; तर कामालादेखील सुरुवात करतेय. यात तिने आणखी एक गोष्ट करून दाखवली आहे. आपल्या मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांच्या आत तिने स्टेज परफॉर्मन्स केलाय. ज्यात ती तीनही खान आणि तिचा पती सैफ अली खानला मानवंदना देणार आहे. तिने एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा परफॉर्मन्स केला. मनीष मल्होत्राच्या स्पेशल डिझायनर वेअरमध्ये तिने हा परफॉर्मन्स सादर केला. 

Web Title: kareena kapoor gift for hubby