करिनाचे बाळासोबत व्हायरल झालेले छायाचित्र बनावट

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई- बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री करिना कपूरचे तिच्या मुलासोबत व्हायरल झालेले छायाचित्र बनावट आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली.

मुंबई- बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री करिना कपूरचे तिच्या मुलासोबत व्हायरल झालेले छायाचित्र बनावट आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली.

करीनाने मुलाल जन्म दिल्यानंतर काही वेळातच सोशल नेटवर्किंगवर दोघांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. परंतु, हे छायाचित्र बनावट आहे. करीना कपूर यांच्या चाहत्यांनी हे छायाचित्र तयार करून व्हायरल केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंगवर फिरत असलेले छायाचित्र हे बनावट आहे. परंतु, पुढील काही दिवसातच बाळाचे व करीनाचे छायाचित्र प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती सैफ अली खानने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये करीनाने मंगळवार (ता. 20) सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला असून, तैमुर अली खान असे या मुलाचे नामकरण करण्यात आले आहे. सैफ व करिना यांचा विवाह 16 ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता.

Web Title: Kareena Kapoor Khan’s fake picture with baby goes viral