तैमुरच्या नॅनीची कमाई आहे लाखात, पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरसोबत त्याची नॅनीही नेहमीच सोबत दिसते. ही नॅनी किती कमवते हे माहित आहे का? स्वत: करीनाने याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या तैमुरची नैनी किती कमवते ! 

मुंबई : बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा कलाकारांची आहे तेवढीच किंबहूना अधिक चर्चा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची आहे. त्यातच जर सर्वाधिक पसंती असलेला आणि वयाच्या तीसऱ्या वर्षीच फेमस असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर इंटरनेट सेंसशन आहे. तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरसोबत त्याची नॅनीही नेहमीच सोबत दिसते. ही नॅनी किती कमवते हे माहित आहे का? स्वत: करीनाने याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या तैमुरची नैनी किती कमवते ! 

ऐश्वर्या रॉयला आली होती 'छपाक'ची ऑफर, या कारणामुळे दिला नकार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pukulu 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi  (@taimuralikhanx) on

काही दिवसांपूर्वीच तैमुरचा तीसरा वाढदिवस साजरा झाला. पण, तैमुर एक वर्षाचा असल्यापासूनच तो एका अभिनेत्याप्रमाणेच कॅप्चर होत आहे. शिवाय, पॅपराझीही त्याला कॅमेरात टिपण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. प्ले स्कुलला जाताना, एअरपोर्टवर, करीना आणि सैफ अली खानसोबत तो कैद होतो. त्याच्यासोबत असणारी नॅनीही नेहमीच दिसते. अगदी लहानपणापासूनच तैमुरसोबत ती असल्याचे दिसते. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिचीही तेवढीच चर्चा पाहायला मिळते. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान करीनाने तिच्या पगाराविषयी खुलासा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

when your sibling says about that one secret that you told not to say to your parent s 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi  (@taimuralikhanx) on

पिंकविलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करीना बोलत होती. त्यावेळी करीना कपूर खानने सांगितले की ती दरमहा तैमुरच्या केअर टेकरला चक्क दीड लाखांपेक्षा जास्त  पगार देते. 

रिषभ पंतने उर्वशी रौतेलाला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केले कारण...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Republic Day 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi (@taimuralikhanx) on

तैमुरची केअर टेकर नेहमीच पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये स्पॉट होते. या गोष्टीचा खुलासा करण्याची करीनाची ही पहिली वेळ नाही. याआधी अरबाज खानच्या चॅटमध्येही तिने ही गोष्ट सांगितली होती. अरबाजच्या 'क्विक हील पिंच' ( Quick Heal Pinch) या शो दरम्यान करीना म्हणाली होती, ''मुलांचा आनंद आणि सुरक्षा कधीही महत्त्वाची आहे. त्याची काही किंमत असू शकत नाही. तुमचं मुल आनंदी आणि सुरक्षित असलं पाहिजे हे महत्त्वाचं''. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi  (@taimuralikhanx) on

करीनाचा नुकताच 'गूड न्यूज' हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, दिलजित दोसांज आणि कियारा अडवाणी यांच्यासोबतचा करीनाचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena kapoor khan reevealed about salary of taimurs nanny