जहांगीरचा पहिला वाढदिवस, पाहा करीनाची हटके पोस्ट

Karrena Kapoor Khan
Karrena Kapoor KhanInstagram

दुसरा मुलगा जहांगीर अली खानच्या आगमनाच्या एका वर्षानंतर, करीना कपूर खान चित्रपटाच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री सुजॉय घोषच्या (Sujoy Ghosh) पुढील क्राईम चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाली आहे. (Kareena Kapoor shares pictures of Taimur and Jahangir)

नुकताच करीनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला...ज्यात तिने तिचा मुलगा 'जेह'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोमध्ये जेह सोबत तैमुर देखील दिसत आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी ही दोन मुलं आहेत.

आजकाल ती तैमूरला शाळेत सोडण्यासाठी जात असताना सतत दिसते. जेहचा हा पहिला वाढदिवस असल्याने करीना खूप उत्साहात आहे.

करीना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'फॉरेस्ट गम्प' या हॉलीवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com