बेबो is back! करीना लवकरच दिसणार क्राईम चित्रपटात

Kareena Kapoor Khan Latest News
Kareena Kapoor Khan Latest News

दुसरा मुलगा जहांगीर अली खानच्या (Jahangir Ali Khan) आगमनाच्या एका वर्षानंतर, करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) चित्रपटाच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री सुजॉय घोषच्या (Sujoy Ghosh) पुढील क्राईम चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाली आहे.

हा चित्रपट केगो हिगाशिनोच्या (Keigo Higashino) सर्वात प्रशंसनीय काम 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' (The Devotion Of Suspect X)चे अधिकृत हिंदी रूपांतर आहे. यात जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) आणि विजय वर्मा (Vijay Verma) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

माहितीनुसार कलाकार लवकरच वर्कशॉप सुरू करतील. जर गोष्टी नियोजित प्रमाणे चालल्या तर,ते पुढच्या महिन्यात पश्चिम बंगालमधील एका हिल स्टेशनला जाणार आहेत जिथे चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल होईल. विशेष म्हणजे 2015 मध्ये जेव्हा सुजॉयने या सिनेमाची घोषणा केली होती तेव्हा त्याने सैफ अली खानला (Saif Ali Khan) कास्ट केले होते. चित्रपट साकार झाला नसला तरी त्याने कथा सोडली नाही. आणि आता सात वर्षांनंतर तो सैफची पत्नी करीनासोबत या प्रोजेक्टची सुरुवात करणार आहे. (Kareena Kapoor Khan Latest News)

हिगाशिनोची कादंबरी एका अविवाहित आईभोवती फिरते जी चुकून तिच्या पतीला मारते. अभिनेत्रीने चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तयारी सुरू केल्याचे समजते आहे. दरम्यान, करीना अभिनेता आमिर खान (Aamir Khan) मुख्य भूमिकेत असलेला ‘लाल सिंग चड्ढा’(Laal Singh Chadda) चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

हा 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय अभिनेत्रीचा एकता कपूर (Ekta Kapoor)आणि हंसल मेहतासोबतचा (Hansal Mehta) एक अनटायटल प्रोजेक्टही आहे. ती करण जोहरच्या (Karan Johar) मॅग्नम ऑपस 'तख्त' (Taqkht) या चित्रपटाचा एक भाग देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com