बेबो करिना कपूरची वॅनिटी वॅन आहे इतकी भव्य आणि आकर्षक.. पहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

अभिनेत्री करिना कपूर खानच्या फिटनेस , सौंदर्यापासून ते तिच्या राहणीमानाविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. अशांतच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खानच्या जबरदस्त लाईफस्टाईलविषयी सगळ्यांनाच माहित आहे. करिनाचा फॅशन सेन्स आणि तिच्या अदा पाहून चाहते वेडे होतात. करिनाचं राहणीमान एखाद्या राजकुमारीसारखंच आहे. इतकंच नाही तर तिच्या फिटनेस , सौंदर्यापासून ते तिच्या राहणीमानाविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. अशांतच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. यात तिच्या शॉटसाठी तिच्या वॅनिटी वॅन मध्ये ती तयार होताना दिसतेय.

हे ही वाचा: सलमान खान-जॅकलीन दिसणार 'तेरे बिना' गाण्यात, सलमानने शेअर केली फार्महाऊसवरची 'ही' मुलाखत

करिनाच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या वॅनिटी मध्ये तयार होण्यासाठी जाते आणि पूर्ण तयार झाल्यानंतर ऑर्डर देते की मी तयार आहे, शूटींगला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिची वॅनिटी वॅन भव्य आणि ग्लॅमरस आहे. करिना देखील या व्हिडिओमध्ये तिच्या हॉट लूकमध्ये दिसून येतेय.

The Scene Inside Kareena Kapoor's Vanity Van Captured In The Video ...

करिना आरश्यासमोर मेकअप करतेय ते झाल्यानंतर ती बोलते, त्यांना सांगा मी तयार आहे, शॉट तयार ठेवा. करिनाची ही वॅनिटी वॅन सोयी-सुविधांनी पुरेपुर अशी दिसून येतेय. एखाद्या मोठ्या बेडरुममध्ये बसून मेकअप करावा अशी तिची ही रुम पाहायला मिळतेय. या रुममध्ये आराम करण्यासाठी बेड, सोफा, फ्रेश होण्यासाठी वेगळी रुम, या रुमच्या बाहेर सामान ठेवण्यासाठी वेगळी रुम असं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर करिना ज्या आरश्यासमोर तयार होतेय तिथे करिनाचे दोन ग्लॅमरस फोटो फ्रेम देखील पाहायला मिळत आहेत. करिना कपूरच्या वॅनिटी वॅनमधील इंटिरिअर पाहूनंच तिच्या उत्तम चॉईसचा अंदाज येतो.

सिनेमांविषयी सांगायचं झालं तर करिना कपूर शेवटची दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत  'अंग्रेजी मिडियम' या सिनेमात दिसून आली होती. तर तीचा आगामी सिनेमा 'लाल सिंह चढ्ढा'मध्ये ती आमीर खानसोबत झळकणार आहे. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलीवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.    

kareena kapoor khan vanity van from inside is too lavish  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kareena kapoor khan vanity van from inside is too lavish