'ए दिल है मुश्‍किल' सर्वोत्कृष्ट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

उरी हल्ल्यानंतर भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी देश सोडून जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्याने करण जोहरचा 'ए दिल है मुश्‍किल' हा चित्रपट अडचणीत सापडला होता.

'ए दिल है'मध्ये पाकिस्तानी फवाद खानची भूमिका आहे. या चित्रपटावरून राजकीय पटावर नाट्यमय घडामोडी घडत असल्या तरी अभिनेत्री करिना कपूर हिने मात्र करण जोहरचा आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे म्हटले आहे.

''मी चित्रपट पाहिला असून मला तो खूप आवडला. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्‍वर्या राय -बच्चन या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे. प्रेक्षकांनाही तो आवडेल,'' असा विश्‍वास 'मामि' चित्रपट महोत्सवात तिने व्यक्‍त केला. 'ए दिल है मुश्‍किल'च्या विशेष खेळाचे आयोजन सोमवारी (ता.25) झाले. त्या वेळी करिनासह, गौरी खान, ट्विंकल खन्ना व रणबीरचे कुटुंब उपस्थित होते.

Web Title: Kareena Kapoor praises Karan Johar for Ae Dil Hai Mushkil