Kareena Kapoor: करीना कपूरने शेअर केले आफ्रिकेतील व्हेकेशनचे फोटो, जिराफसोबत खेळताना दिसले तैमूर आणि जेह

अभिनेत्री सध्या तिचा पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत आफ्रिकेत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
kareena kapoor and saif ali khan
kareena kapoor and saif ali khanSakal

करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री दोन मुलांची आई आहे. दुसरीकडे, करीना शूटिंगमध्ये व्यस्त नसताना ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी सोडत नाही.

अभिनेत्री सध्या तिचा पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत आफ्रिकेत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. करिनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर तिच्या ट्रिपचा फोटोही शेअर केला आहे आणि फोटो पाहून असे म्हणता येईल की अभिनेत्री कुटुंबासोबत खूप एन्जॉय करत आहे.

करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या आफ्रिकेच्या सुट्टीतील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तिच्या ट्रिपचा हा पहिलाच फोटो असून यामध्ये सैफ अली खान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान हे तिघेही मस्ती करताना दिसत आहेत. फोटोत, सैफ लाईट ब्लु कलरच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे ज्याला त्याने निळ्या डेनिम्ससह पेअर केले आहे.

kareena kapoor and saif ali khan
Milind Gawali: 'मराठीत आधी रडके पिक्चर्स का बनायचे..', पोस्ट करत मिलिंद गवळीनं सांगितलं त्यामागचं सीक्रेट

त्याने बेज रंगाची कॅप घातली आहे आणि पांढर्‍या शूजसह त्याने लूकला पूर्ण केले आहे. फोटो पाहता सैफ आपल्या पत्नीसाठी पोज देत असल्याचे दिसते. मात्र, समोर उभ्या असलेल्या जिराफला पाहण्यात करिनाच्या दोन्ही मुलांना जास्त रस असल्याचे फोटोत दिसून येते. तैमूर आणि जेह दोघेही कॅमेऱ्याकडे पाठ करून जिराफकडे पाहताना खूप गोंडस दिसत आहेत.

kareena kapoor
kareena kapoorSakal

कामाबद्दल बोलायचे झाले तर, हंसल मेहताच्या थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगनंतर करीना कपूर नुकतीच यूकेहून परतली आहे. याशिवाय तिच्याकडे तब्बू, दिलजीत दोसांझ आणि क्रिती सेनॉन सोबत रिया कपूरचा 'द क्रू' देखील आहे. करिनाकडे जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत सुजॉय घोषचा 'थ्रिलर'ही आहे.

सैफ अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा 'विक्रम वेधा' मध्ये दिसला होता ज्यामध्ये त्याने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याच्याकडे 'आदिपुरुष' हा चित्रपट आहे ज्यामध्ये तो प्रभास, क्रिती सेनॉन आणि सनी सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com