करिनाने शेयर केले लाल सिंग चढ्ढाच्या शुटिंगचे फोटो

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

करिनाने इंस्टाग्रामवरुन तिने फोटो शेयर केले आहे. त्यात तिने लाल सिंग चढ्ढाच्या चित्रिकरणाच्या वेळी आपल्याला फार अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती आणि करिनाचे गर्भारपण.

मुंबई - प्रसिध्द अशा फॉरेस्ट गंम्प या चित्रपटावर बेतलेल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात आली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असणा-या करिनाने चित्रिकरणा दरम्यानचे फोटो सोशल मीडियातून शेयर केले आहे.  साधारण पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करिनाने इंस्टाग्रामवरुन तिने फोटो शेयर केले आहे. त्यात तिने लाल सिंग चढ्ढाच्या चित्रिकरणाच्या वेळी आपल्याला फार अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती आणि करिनाचे गर्भारपण. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यात संपूर्ण देश सहा महिन्यांपासून अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढाचे चित्रिकरण सुरु झाले आहे. त्यात करिना कपूरची भूमिका आहे.

 लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट हा 1994 साली आलेल्या हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंम्प या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यात हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. आमीरचा हा बहूचर्चित, लक्षवेधी चित्रपट आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीही दिसणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण अनेक महिन्यांपासून लांबले होते. त्यामुळे त्य़ाच्य़ा प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी 2021 च्या नाताळात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

Aamir Khan unveils Kareena Kapoor Khan's look from 'Laal Singh Chaddha' |  Celebrities News – India TV

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी करिनाने गरोदर असल्याने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. सहकलाकार आमीर खान, आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक अव्दैत चंदन यांनी सहकार्य केल्याचे करिनाने सांगितले. 
  
 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena Kapoor shares she was nervous shooting for Laal Singh Chaddha amidst pandemic her pregnancy