करीनाचा नकार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या चित्रपटात बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख दिसणार आहे.

दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या चित्रपटात बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूखसोबत बेबो अर्थात करीना कपूर झळकणार होती; परंतु तिने नकार दिल्याने आता नव्या नायिकेचा शोध सुरू झालाय. खात्रीलायक वृत्तानुसार आनंद एल. राय यांना आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी करीनाला घ्यायचं होतं; मात्र तिच्या आगामी "वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा क्‍लॅश होत असल्यामुळे तिने नकार दिला. करीनाने नाही म्हटल्यावर आता प्रमुख भूमिकेसाठी नायिकेचा शोध सुरू झाला आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती; मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा व कतरिना कैफची वर्णी लागली आहे. नुकतीच आई झालेली करीना "वीरे दी वेडिंग'साठी सध्या जिममध्ये घाम गाळतेय. त्यात करीनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title: kareena says no