Shershah : विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये सिध्दार्थ-कियारा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 May 2019

कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका निभावण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचे सिध्दार्थ मल्होत्राने म्हटले आहे.

कारगील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर लवकरच आपल्याला बायोपिक बघायला मिळणार आहे. या बायोपिकची आज सोशल मिडीयावर घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटातील मुख्य कलाकारही जाहीर करण्यात आले आहेत.

अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका निभावतील. कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका निभावण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचे सिध्दार्थने म्हटले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या या बायोपिकचे दिग्दर्शन विष्णु वर्धन करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू जोहर, अपुर्व मेहता, शाबीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशु गांधी हे करत आहेत. या सर्व माहितीचे एक पोस्टर आज सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले आहे. चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरु होणार असल्याचा उल्लेखही पोस्टरवर आहे.

कारगील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा​ -

Image may contain: 1 person, closeup

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kargil Hero Vikram Batras biopic announcement named Shershah Siddharth Malhotra kiara advani playing the role